राज, राणे आणि राणा म्हणजे 'RRR' चित्रपट; राज्यातील राजकारणावर भुजबळांची प्रतिक्रिया

राज्यात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेच्या शक्यतेने जोर धरला आहे. रविवारी (1 मे रोजी) झालेल्या सभेमध्ये बारा अटी मोडल्याप्रकरणी पोलिसांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Political Leaders
Political LeadersSaam Tv

अभिजित सोनावणे

नाशिक: राज्यात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेच्या शक्यतेने जोर धरला आहे. रविवारी (1 मे रोजी) झालेल्या सभेमध्ये बारा अटी मोडल्याप्रकरणी पोलिसांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा बजवण्यास सुरूवात केली आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेस मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज, राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट (RRR Movie), असल्याची खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनाही अटक झाली त्यानंतर आता नवनीत राणा आणि रवी राणा अटकेत असल्याने हा ही मुद्दा सध्या चर्चेत आहे आणि आता राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच भुजबळ यांनी राज्यातील राजकीय मुद्द्यांना ट्रिपल आरची उपमा देत टोला लगावला आहे.

Political Leaders
सोलापुरात हुंडाबळीची घटना; नातेवाईकांचा हत्या केल्याचा आरोप, पण...

भुजबळ काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, पोलिसांनी नियमाप्रमाणे नोटीस दिल्या होत्या. पोलिसांनी भाषण तपासल आहे. त्यातून त्यांनी अतिशय अग्रेसिव्ह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केले असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस कायद्याप्रमाणे काम करतात. शेवटी न्याय पालिका विचार करणार, हे सगळं रुटीन आहे. नोटीस येणार याची त्यांची देखील मानसिक तयारी आहे. त्यानंतर भुजबळ म्हणाले, केंद्रीय मंत्री राणे यांना देखील अटक झाली. त्यानंतर राणा यांना देखील अटक झाली. कोर्टाने देखील राणा दाम्पत्याला फटकारल. कायदे बनवणारे अस कस करू शकतात अस न्यायालयाने देखील म्हटलं आहे. राज,राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट असा टोला त्यांनी एकूणच या सर्व प्रकरणावर लगावला आहे.

'अस भाषण करताना कारवाई होणार याची तयारी असतेच. त्यामुळे आंदोलन करण्यावर ठाम असाल तर पोलीस आपलं काम करतील,' असा इशारा यावेळी छगन भुजबळ यांनी दिला आहे.

हे देखील पहा-

राज्यभर मनसे कार्यकर्त्यांना नोटीस;

पोलिसांनी राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरूवात केली आहे. मनसे कार्यकर्त्यांना नोटीस द्यायला सुरुवात केल्यानंतर पुण्यातील अनेक मनसेचे नेते मात्र नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. तर, वसंत मोरे चार दिवसाच्या देवदर्शनासाठी बालाजीला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com