Karnataka Election Result : राज ठाकरेंनी केलं राहुल गांधींचं तोंडभरून कौतुक, भाजपला दिले कडू डोस

Raj Thackeray On Karnataka Election Result: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील निकालावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.
Karnataka Election Result
Karnataka Election ResultSaam TV

Raj Thackeray: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे काँग्रेस नेत्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला. कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये या निवडणुकीत काट्याची टक्कार पहायला मिळाली. समोर आलेल्या निकालानंतर सर्वच राजकीय नेते यावर आपलं मत व्यक्त करत आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. (Latest Raj Thackeray News)

यावेळी राज ठाकरेंनी काँग्रेसचे कौतुक केले आहे. तर भाजपचे काण टोचले आहेत. राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, " कर्नाटकमधील विजय हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिमाण आहे. तर कर्नाटकमधील भाजपचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Karnataka Election Result
Nalasopara Crime News: गटारात सापडला महिलेचा मृतदेह; नालासोपारामधील खळबळजनक घटना

भाजपच्या पराभवाचं सांगितलं कारण

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) माध्यमांशी संवाद साधताना पुढे म्हटलं आहे की, " आपलं कोण वाकड करू शकतो असा जो विचार करतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला लोकांना कधी गृहीत धरू नये. याचा सर्वांनीच बोध घेण्याची गरज आहे आणि तो सगळ्यांनी घ्यावा. असा सल्ला राज ठाकरेंनी भाजपला दिला आहे.

कर्नाटकात कोण होणार मुख्यमंत्री?

कर्नाटकात बहुमतासाठी (Karnataka Election Result २०२३) लागणारा ११३ चा जादुई आकडा काँग्रेसने पार केला आहे. या निवडणुकीत १३५ जागा मिळवून काँग्रेसने भाजपच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. मात्र कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री (New CM Of Karnataka) कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसकडून अद्याप आलेले नाही. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी एक फॉर्म्युला निश्चितच तयार आहे, तो म्हणजे काँग्रेस कर्नाटकात प्रत्येक वर्गाला प्रतिनिधित्व देण्याची तयारी करत आहे.

Karnataka Election Result
Political News: किशोर आवारे हत्या प्रकरणी जबाबदार कोण? सुनील शेळके यांनी स्वत: दिलं स्पष्टीकरण

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पहिले नाव माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांचे आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. डीके शिवकुमार गेली पाच वर्षे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना तीन वेळा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. मात्र, त्यांच्या मनातही कर्नाटकचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नक्कीच कायम असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com