मोठी बातमी! राज ठाकरे, राज्यपाल कोश्यारी औरंगाबादमध्ये एकाच हॉटेलमध्ये

राज्यपाल कोश्यारी आणि राज ठाकरे यांची भेट होणार का, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहेत.
Raj Thackeray and Governor Bhagat Singh Koshyari
Raj Thackeray and Governor Bhagat Singh Koshyari Saam Tv

औरंगाबाद: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे उद्या १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. यासाठी राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. याच दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही (Bhagat Singh Koshyari) आज औरंगाबादमध्ये आले आहेत. राज्यपाल कोश्यारी आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळते. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी आणि राज ठाकरे यांची भेट होणार का, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहेत.

राज्यपाल कोश्यारी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी औरंगाबादमध्ये आल्याचे बोलले जात आहे. औरंगाबादमधील हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये ते थांबले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.

Raj Thackeray and Governor Bhagat Singh Koshyari
Aurangabad | अमित ठाकरे औरंगाबादमध्ये, राज ठाकरेंच्या सभेला कोणकोणते नेते उपस्थित राहणार?

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्या संदर्भात राज्य सरकारला इशारा दिला आहे. मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर भोंग्यावरुन हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. या सभेवर राज्यातून विरोध होत होता.

राज ठाकरेंनी औरंगाबादला जाण्याअगोदर पुण्याला भेट दिली. आज त्यांनी वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते औरंगाबादकडे रवाना झाले. उद्या त्यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे यांची मोर्चे बांधणी सुरु असल्याचे बोलले जात आहे.

Raj Thackeray and Governor Bhagat Singh Koshyari
राज ठाकरे पुण्यात, वसंत मोरे कुठे? मोरेंची फेसबूक पोस्ट व्हायरल

राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा औरंगाबादजवळ अपघात

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. औरंगाबाद जवळील वाळूज येथे हा अपघात घडल्याची माहिती आहे. या ताफ्यातील गाड्यांचा दोनवेळा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

या अगोदर घोडेगाव येथे काही वेळांपूर्वी ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये दोन गाड्यांचे नुकसान झाले होते. वाळूज येथे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या गाडीलाही अपघात झाला आहे. या अपघातात बारा गाड्यांचे नुकसान झाले आहे. राज ठाकरे औरंगाबादेत पोहचले आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com