
औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज यांची आज औरंगाबादमध्ये सभा होत आहे. पुण्यातून हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंनी दोन घोषणा केल्या त्यापैकी एक होती औरंगाबादची सभा ठाकरे (Raj Thackeray Aurangabad Speech). आज राज ठाकरेंनी राज्यातील अनेक विषयावर भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण राज ठाकरेंनी करुन दिली. औरंगाबादचं मूळ नाव खडकी, आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच, एक देवगिरीचा किल्ला दुसरी पैठण. महाराष्ट्र समूजन घेणं गरजेचं आहे, तो समजून घेऊ. जो जो इतिहास विसरला त्याच्या पायखालचा भूगोल सरकला असे राज ठाकरे म्हणाले.
आजच्या सभेतही राज ठाकरेंनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. माझी दोन भाषणं झाली, काय फडफडायले लागले. शरद पवार म्हणाले राज ठाकरे दोन समाजात भांडण लावत आहेत. पवार साहेब, जाती जातीमध्ये जो भेद करतायेत त्यामुळे महाराष्ट्रात दुही माजत आहे अशी टीका राज ठाकरेंनी शरद पवारांवरती केली आहे. शरद पवार म्हणाले राज ठाकरेंनी त्यांच्या आजोबांची पुस्तकं वाचावित. मी सर्व पुस्तकं वाचली आहेत तुम्ही फक्त तुमच्या फायद्याचे वाचले आहे असे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेमध्ये राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सबंध राज्यातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला आलेले आहेत. आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
सभेअगोदर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुषाश देसाई यांनी राज ठाकरेंवरती टीका केली होती. आजची होणारी सभा ही सुपारी सभा आहे या सुपारी सभेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणाऱ्या 14 मे च्या सभेत समाचार घेतील असं औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी म्हटलं आहे ते औरंगाबादमधील (Aurangabad) शिवसैनिकांच्या प्रशिक्षण सभेत बोलत होते. लेका दुपारपर्यंत झोपून राहतोस अन पहाटच्या भोंगाच्या काय त्रास करून घेतोस असा टोमणाही देसाई यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.