Video: राज ठाकरे यांच्या श्वानप्रेमाचे पुन्हा दर्शन; डॉली नावाच्या श्वानाला मांडीवर घेत प्रेमानं गोंजारलं

Dog Lover Raj Thackeray: एका पदाधिकाऱ्याच्या श्वानावर राज ठाकरेंची नजर पडली आणि त्यांनी या डॉली नावाच्या श्वानाला प्रेमाने गोंजारत काही वेळ घालवला.
Dog Lover Raj Thackeray
Dog Lover Raj Thackerayअमोल कलये

Raj Thackeray Latest News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानप्रेम जगजाहिर आहे. याचाच प्रत्यय पु्न्हा एकदा रत्नागिरीत आला आहे. राज ठाकरे हे सध्या रत्नागिरीत असून त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यादरम्यान शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांचे श्वानप्रेम दिसून आले. एका पदाधिकाऱ्याच्या श्वानावर राज ठाकरेंची नजर पडली आणि त्यांनी या डॉली नावाच्या श्वानाला प्रेमाने गोंजारत काही वेळ घालवला. (Dog Lover Raj Thackeray)

Dog Lover Raj Thackeray
BJP MLA Prasad Lad: छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात; पुन्हा वादाची ठिणगी, चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर लाडांची दिलगिरी

यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं श्वानप्रेम (Dog Lover) प्रत्यक्षपणे पाहायला मिळालं. मनसे पदाधिकारी विश्वराज सावंत याची ही डॉली नावाची श्वान आहे. रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद संपल्यावर बाहेर पडताना राज ठाकरे यांची नजर डॉलीवर पडली आणि त्यांनी डॉली श्वानाला मांडीवर घेऊन तिला गोंजारत तिचे लाड केले. तसेच काही वेळ या डॉली नावाच्या श्वानाबरोबर घालवला.

पाहा व्हिडिओ -

तपासणीसाठी आलेल्या पोलिसांच्या श्वानाचे राज ठाकरेंनी पुरवले लाड

१८ सप्टेंबर २०२२ ला राज ठाकरे ट्रेनने विदर्भ दौऱ्यासाठी रवाना झाले होते. त्यावेळी विदर्भ एक्सप्रेसमध्ये सुरक्षा तपासणीसाठी पोलीस आपल्या दलातल्या लॅब्राडोर जातीच्या श्वानासह आले होते. तेव्हादेखील श्वानाला राज ठाकरे यांनी आपल्या जवळ बसवून घेतलं. तसंच पोलिसांकडे या श्वानाची चौकशीही केली. त्याला आराम मिळतो ना, जेवण वेळेत दिलं जातं ना, अशी चौकशीही राज ठाकरेंनी केली होती. शिवाय या कुत्र्याची काळजी घेताना काय करावं, काय करू नये याबद्दलही राज ठाकरेंनी थोडक्यात सूचना दिल्या होत्या. (Latest Marathi News)

Dog Lover Raj Thackeray
Viral Video: लग्नमांडवात शोककळा; वरमाला घालताच नवरीचा मृत्यू, दुर्देवी घटनेनं हळहळ

जेम्सला निरोप देताना पाणावले होते राज ठाकरेंचे डोळे

राज ठाकरेंचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्या घरात त्यांचा लाडका जेम्स नावाचा श्वान होता. जेम्सच्या निधनानंतर आता त्यांच्याकडे मुफासा आणि ब्लू असे दोन श्वान आहेत. २९ जुलै २०२१ ला जेम्सच्या निधनानंतर राज ठाकरेंनी स्वतः स्मशानभूमीत जाऊन त्या श्वानावर अंत्यसंस्कार करत त्याला अखेरचा निरोप दिला होता, त्यावेळी राज ठाकरेंचे डोळे पाणावले होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com