Raj Thackeray News : राज ठाकरेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट; जाणून घ्या प्रकरण (पाहा व्हिडिओ)

मनसे कार्यकर्त्यांनी मेळाव्याची तयारी सुरु केली आहे.
Raj Thackeray, Beed, Court
Raj Thackeray, Beed, Courtsaam tv

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना चीतावणीखोर वक्तव्याबद्दल परळी (बीड) न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. पुढील दहा दिवसांत राज ठाकरे हे परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. अजामीनपात्र वॉरंट रद्द करून जामीन मिळवण्यासाठी राज ठाकरे यांचे प्रयत्न असल्याचे समजते. दरम्यान राज ठाकरे हे लवकरच परळीत येणार असल्याची खात्रीशिर माहिती मनसे जिल्हा प्रमूख सुमंत धस यांनी दिली.

सन (2008 मध्ये) राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. या अटके नंतर त्याचे पडसाद परळीत उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली. त्यावेळी बसचे नुकसान झाले होते. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणी दिल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता.

Raj Thackeray, Beed, Court
Ajit Pawar News : 'अजित पवार हाय हाय...', पवारांच्या 'त्या' विधानावर बाळासाहेबांची शिवसेना - भाजप आक्रमक

दरम्यान राज ठाकरे व मनसे कार्यकर्ते न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले हाेते. त्यानंतर मनसेचे तत्कालीन पदाधिकारी संजय अघाव, प्रल्हाद सुरवसे, अनीस बेग, शिवदास बिडगर, राम लटपटे या पाच जणांनी न्यायालयात हजर हाेऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. त्यानंतरही राज ठाकरे यांच्याविरुद्ध (13 एप्रिल) दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

Raj Thackeray, Beed, Court
Satara News : शिंदे- फडणवीस सरकार आम्हांला घाबरले : पृथ्वीराज चव्हाण

दरम्यान या प्रकरणी राज ठाकरे हे येत्या बारा जानेवारीला न्यायालयात (court) उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिका-यांनी दिली. राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार असल्याचे सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com