Raj Thackeray| ...तर अंगावर येईल; मराठी, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे पुन्हा गरजले!

मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले दिसले.
Raj Thackeray On Vidarbha Visit
Raj Thackeray On Vidarbha VisitSAAM TV

Raj Thackeray In Nagpur| नागपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक होत विरोधकांना इशारा दिला आहे. माझ्या मराठीला नख लावलं तर, मराठी म्हणून अंगावर येईल, तसेच हिंदुत्वाला हात लावला तर हिंदू म्हणून मी अंगावर येईल, असं ते म्हणाले. नागपूरमध्ये आज, सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते.

Raj Thackeray On Vidarbha Visit
राज्यात आलेले उद्योग बाहेर कसे जातात? फॉक्सकॉन प्रकल्पावर राज ठाकरेंचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राज यांनी आज, सोमवारी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय स्थिती, वेदांता प्रकल्प यांसह इतर मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठी आणि हिंदुत्व या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला असता, राज अधिक आक्रमक झालेले दिसले.

Raj Thackeray On Vidarbha Visit
Raj Thackeray Speech : मनसे-भाजप युती होणार? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

माझ्या मराठीला नख लावलं तर मी मराठी म्हणून अंगावर येईल, तर धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर येईल, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.

यावेळी त्यांनी या भूमिकेबाबतचे मागील संदर्भही दिले. माझ्या पक्षाच्या अधिवेशनात मी ही भूमिका मांडली होती. नुकताच पक्षाचा सदस्य नोंदणीचा कार्यक्रम झाला. त्यात टॅगलाइन वाचली तर तुमच्या लक्षात येईल. मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक अशी ती टॅगलाइन आहे.

माझ्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही. रझा अकादमीविरोधात मी मोर्चा काढला त्यावेळी बाकीचे कुठे होते? पाकिस्तानी कलावंतांना हाकलून दिले तेव्हा बाकिच्यांना का प्रश्न नाही विचारले? माझ्या भूमिकेत कधीच बदल होत नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.

मनसे-भाजप युती होणार?

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपची युती होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारला. आमचं युतीबाबत काही बोलणं झालं नाही. युतीबाबतच्या बातम्या मी तुमच्याकडूनच ऐकतो आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com