
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) यांची आज औरंगाबाद येथे सभा होत आहे. या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच पुरोहित संघटनेचे १२१ पुरोहित औरंगाबाद (Aurangabad) शहरात पोहचले आहेत. हिंदू धर्म रक्षक राज ठाकरे यांच्या सभेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो असल्याचं या पुरोहितांनी सांगितलं आहे. राज यांची सभा सुरू होण्यापूर्वी आम्ही मंत्रपठण करणार असल्याचंही पुरोहितांकडून सांगण्यात आलं आहे.
औरंगाबादमध्ये येण्यापूर्वी राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांच्या पुण्यातील राजमहाल या निवासस्थानासमोर पुण्यातील पुरोहित वर्ग एकत्र आला होता. यावेळी पुरोहितांनी शंखनाद करून शांती मंत्राचे पठण करत राज ठाकरे यांचं भव्य स्वागत देखील केलं होतं. इतकंच नाही तर पुरोहितांनी राज ठाकरेंना पुढील वाटचालीसाठी त्यांना आशीर्वादही दिले होते. तर औरंगाबादच्या सभेसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.
औरंगाबादमध्ये २ हजार पोलिसांचा बंदोबस्त
दरम्यान, राज ठाकरे यांची सभा रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. या सभेत राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार? सभेत काय बोलणार, याचीच उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही आहे. यावेळी राज ठाकरेंच्या सभेला कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. यामध्ये ३ डीसीपी ६ एसीपी, ३० पीआय, इतर ३०० अधिकारी आणि २ हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात असतील. सोबतच औरंगाबाद ग्रामीण, जालना, अहमदनगर, पुणे यासह गरज पडल्यास इतर जिल्ह्यांमधूनही पोलिसांची कुमक मागवली जाण्याची शक्यता आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.