Raj Thackeray : माहिम समुद्रातील ते बांधकाम महिनाभरात हटवा, नाहीतर... राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम

Raj Thackeray's Speech: राज ठाकरेंनी माहिमच्या समुद्रातील व्हिडिओ दाखवत सरकार आणि प्रशासानाला अनधिकृत बांधकाम हटवण्याचा अल्टीमेटम देखील दिला.
MNS Gudhi Padwa Melava News
MNS Gudhi Padwa Melava Newssaam tv

Raj Thackeray's Gudi Padwa Melava: गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क मैदानात मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी आपल्या भाषणादरम्यान माहिमच्या समुद्रातील व्हिडिओ दाखवत सरकार आणि प्रशासानाला अनधिकृत बांधकाम हटवण्याचा अल्टीमेटम देखील दिला.

यावेळी भाषणादरम्यान राज ठकारेंनी माहिमच्या समुद्राचा एक व्हिडिओ दाखवला. या ठिकाणी गेल्या दोन वर्षात अनधिकृतरित्या मजार उभा करण्यात आली. माहिम पोलीस स्टेशन जवळच आहे, पण त्यांचं लक्ष नाही. महानगरपालिकेचं लक्ष नसतं. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर हा प्रकार सुरु आहे असे म्हणत राज ठाकरेंनी त्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

MNS Gudhi Padwa Melava News
Raj Thackeray Speech : छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो...! राज ठाकरेंनी सांगितला उद्धव ठाकरेंचा 'तो' किस्सा

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, हे लोकं नवं हाजीअली तयार करणार... मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, पालिका आयुक्तांना सांगतो महिनाभराच्या आत कारवाई झाली नाही, तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला गणपतीचं सर्वात मोठं मंदिर आम्ही उभं करु. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ देत.. असं म्हणत त्यांनी सरकारला अल्टीमेटम दिला.

MNS Gudhi Padwa Melava News
Raj Thackeray Speech : अलिबाबा आणि चाळीस जण सोडून गेले, फक्त... शिंदेंबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

राज ठाकरे म्हणाले, मी दाखवतोय ते मुस्लिमांना मान्य आहे का? अशा प्रकारे तुम्ही कोणालाही सवलती देत असाल, दुर्लक्ष करत असाल तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा. एकदा राज्य माझ्याकडे आलं तर संपूर्ण राज्य सूतासारखं सरळ करुन ठेवेन. परत कुणाची हिंमत नाही होणार वाकडी नजर करून बघायची, असे म्हणत राज ठाकरेंनी मतदारांना देखील आवाहन केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com