Raj Thackeray यांच्या इशाऱ्याची गंभीर दखल! मुंबईचं अख्खं प्रशासन कामाला लागलं; तुम्ही पहिला का तो Video?

Raj Thackeray Speech : पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी स्थानिक पोलिसांना माहीम परिसरातील अतिक्रमणाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.
Raj Thackeray Sabha News Updates
Raj Thackeray Sabha News Updatessaam tv

Raj Thackeray On Mahim Encroachment: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज गुढीपाडवा मेळाव्यात संबोधित करताना माहीम समद्रातील अतिक्रमण हटवाण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या इशाराच्या पोलिस प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज ठाकरेंनी इशारा देताच प्रशासनाने अलर्ट होऊन माहीम परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

या प्रकरणाच्या पडताळणीबाबत पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी स्थानिक पोलिसांना माहीम परिसरातील अतिक्रमणाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज ठाकरेंनी अनधिकृत म्हटलेल्या अतिक्रमणाची जागा महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही, ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हद्दीत येते असे बीएमसीने म्हटले आहे. त्यामुळे त्यासंदर्भात कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच असल्याचे बीएमसीने स्पष्ट केले आहे.

Raj Thackeray Sabha News Updates
Raj Thackeray : माहिम समुद्रातील ते बांधकाम महिनाभरात हटवा, नाहीतर... राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम

समुद्रातील आतील भागात बांधकाम असल्याने सदर अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. समुद्र जिथे सुरू होतो त्या समुद्राच्या आतील भागात मुंबई महापालिकेची हद्द संपते त्यामुळे या हद्दीमध्ये मुंबई महापालिका कारवाई करू शकत नाही. तरीसुद्धा मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कारवाई संदर्भात निर्णय घेतील असे बीएमसीने म्हटले आहे.

राज ठाकरेंनी दिला अल्टीमेटम

यावेळी भाषणादरम्यान राज ठकारेंनी माहिमच्या समुद्राचा एक व्हिडिओ दाखवला. या ठिकाणी गेल्या दोन वर्षात अनधिकृतरित्या अतिक्रमण करण्यात आले आहे. माहिम पोलीस स्टेशन जवळच आहे, पण त्यांचं लक्ष नाही. महानगरपालिकेचं लक्ष नसतं. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर हा प्रकार सुरु आहे असे म्हणत राज ठाकरेंनी कारवाई करण्याची मागणी केली.

Raj Thackeray Sabha News Updates
Raj Thackeray Speech : छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो...! राज ठाकरेंनी सांगितला उद्धव ठाकरेंचा 'तो' किस्सा

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, हे लोकं नवं हाजीअली तयार करणार आहे... मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, पालिका आयुक्तांना सांगतो महिनाभराच्या आत कारवाई झाली नाही, तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला गणपतीचं सर्वात मोठं मंदिर आम्ही उभं करु, मग काय व्हायचं ते होऊन जाऊ देत, असं म्हणत त्यांनी सरकारला अल्टीमेटम दिला.

येथे पाहा व्हिडिओ...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com