राजन शिंदे यांच्या खून प्रकारचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक?

अजूनही कुठलाच सुगावा लागला नसल्याने नक्की काय घडलं आहे हे कोडंच
राजन शिंदे यांच्या खून प्रकारचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक?
राजन शिंदे यांच्या खून प्रकारचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक?Saam Tv

औरंगाबाद - शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या एन २ भागात प्राध्यापक राजन शिंदे यांच्या खून प्रकरणात चार दिवसांनंतरही काहीही उलगडा होऊ शकला नाही. मग खून कुणी केला याचं उत्तर शोधणं आता पोलिसांसाठी अधिकच आव्हानात्मक झालं आहे. पोलीस आयुक्तांसह पोलिसांच्या पथकाला अजूनही कुठलाच सुगावा लागला नसल्याने नक्की काय घडलं आहे हे कोडंच आहे.

औरंगाबाद शहरातील नामांकित प्राध्यापक, डॉक्टर आणि उद्योजक राहणाऱ्या या सिडकोतल्या एन 2 मध्ये सोमवारी पहाटे एका नामांकित प्राध्यापकाचा खून झाला. ४ दिवसानंतरही पोलिसांना खुनाचा तपास लागला नाही. पोलीस आयुक्त, तीन उपायुक्त सह चार पथक तपास करूनही हाती काहीच लागले नाही.

हे देखील पहा -

ज्यारात्री खून झाला, त्या रात्रीचे आणि त्याअगोदरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता त्यात कुटुंबातील सदस्य व्यतिरिक्त कोणीच घरात आलेले दिसले नाही. त्यामुळे राजन शिंदे यांचा खून अत्यंत प्लॅनिंग करून करण्यात आल्याचे दिसून येत आहे. खून झाल्यानंतर पहाटे मुलगा घराबाहेर पडतांना आणि नंतर अंबुलन्स घरी आणल्याचं दिसत आहे. जर तिसरं कुणीच त्याच दिसत नाही तर खून घरातल्यानीच कुणी केला असावा असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

राजन शिंदे यांच्या खून प्रकारचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक?
लाच घेणारी आरपीएफ महिला उपनिरीक्षक गजाआड

सध्या या खून प्रकरणावर पोलीस काहीच बोलायला तयार नाहीत. क्राईम अधिकारी एरवी छोट्या छोट्या गोष्टीत प्रसिद्धी घेण्यासाठी तत्पर असतात, मात्र शहराला हादरून टाकणाऱ्या खुनाचा तपास चार दिवसानंतरही का लागत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.  याआधीही औरंगाबाद शहरातील काही खून प्रकरणाला वर्ष लोटून गेले तरी पोलीस काहीही शोधण्यात असमर्थ ठरले आहेत. याही प्रकरणात आतापर्यंत पोलिसांना काहीही ठोस सापडू शकले नाही. त्यामुळे हे ही प्रकरण न उलगडता बंद होते का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. एका प्राध्यापकाचा राहत्या घरात निर्घूण खून होतो आण तीन दिवस उलटूनही पोलीस यात काहीच करू शकत नाही, म्हणजे कायदा व्यवस्था अस्तित्वात आहे का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.