सेल्फी काढा बक्षीस जिंका, ९ गटात स्पर्धा : वेदांतिकाराजे भाेसले

१५ जानेवारी २०२२ पर्यंत सेल्फी पाठवायचा आहे.
rajdhani satara selfie point
rajdhani satara selfie point

सातारा : स्वातंत्रोत्तर भारताचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत असून यानिमित्ताने ऐतिहासिक सातारा शहरात उभारण्यात आलेल्या 'राजधानी सातारा' या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्याची 'राजधानी सातारा सेल्फी महोत्सव' या स्पर्धेचे आयाेजन केल्याची माहिती कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्षा वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले (vedantikaraje bhosale) यांनी दिली.

वेदांतिकाराजे भाेसले म्हणाल्या स्पर्धा एकूण नऊ गटांत होईल. प्रत्येक गटातील उत्कृष्ट १२ स्पर्धकांना बक्षिस देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी स्वतःच्या मोबाईलवर सेल्फी काढून (फिल्टर अथवा कोणताही बदल न करता) फोटो स्वतःचे नाव, पत्ता आणि कोणत्या गटातील सेल्फी आहे याचा उल्लेख जरुर करावा.

rajdhani satara selfie point
Stephen Curry : एनबीए त 3 पॉइंटर्सचा विक्रम स्थापित (पहा Video)

'मी सैनिक' या गटात १२ विजेते काढले जाणार आहेत. या गटात सैन्यदलात कार्यरत असणारे अथवा निवृत्त झालेले नागरिक (महिला / पुरुष) सहभागी हाेऊ शकतील. १३ ते २५ वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी 'आय लव्ह मी' म्हणजेच स्वतःचा सेल्फी या गटात १२ पुरुष आणि १२ महिलांना पारितोषिक दिले जाणार आहे.

मी व माझा मित्र किंवा मैत्रीण (यामध्ये फक्त दोन व्यक्तीचाच सेल्फी असावा) या गटातील विजेत्या १२ स्पर्धकांना बक्षीस मिळणार आहे. १२ वर्षाखालील मुलांचा सेल्फी (केवळ एक मुलगा अथवा एक मुलगी) या गटात उत्कृष्ट २४ स्पर्धकांना बक्षीस मिळणार आहे. जोडीदार (पती- पत्नी) या गटात ४० वर्षाखालील आणि ४० वर्षावरील अशा दोन गटांसाठी २४ बक्षिसे दिली जाणार आहेत.

मी व माझे कुटुंब सेल्फी या गटामध्ये संपूर्ण कुटुंबाचा सेल्फी आवश्यक असून या गटातील उत्कृष्ट २४ स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. ग्रुप सेल्फी (महिला आणि पुरुष) या गटात २४ बक्षिसे दिली जाणार आहेत. (ग्रुप सेल्फी गटामध्ये सहभागी होताना एका ग्रुपमध्ये १० पेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत).

मी आणि माझी आई सेल्फी, मी आणि माझे वडील सेल्फी या गटामध्ये उत्कृष्ट सेल्फीसाठी २४ बक्षिसे दिली जाणार आहेत. २५ वर्षांवरील महिला आणि पुरुष सेल्फी (स्वतःचा सेल्फी) या गटातील उत्कृष्ट २४ स्पर्धकांना गौरविले जाणार आहे.

स्पर्धकांनी ९१४६१५५६५५ या क्रमांकावर १५ जानेवारी २०२२ पर्यंत सेल्फी पाठवायचा आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस, ट्रॉफी आणि सन्मानपत्र दिले जाणार असून विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. बक्षीस वितरण राजधानी सातारा सेल्फी पॉईंट, पोवई नाका येथे २६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत केले जाणार असून या अनोख्या स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वेदांतिकाराजे भाेसले यांनी केले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com