राजीनामासत्र! बीड जिल्हाध्यक्ष पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना

नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी मुंबईला रवाना
राजीनामासत्र! बीड जिल्हाध्यक्ष पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना
राजीनामासत्र! बीड जिल्हाध्यक्ष पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवानाविनोद जिरे

विनोद जिरे

बीड - भाजप खासदार प्रीतम मुंडे Pritam Munde यांना केंद्रीय मंत्रीपदापासून डावलल्याने, बीड जिल्ह्यातील भाजप BJP पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र सुरूच आहे. आतापर्यंत तब्बल ७७ जणांनी राजीनामे दिले असून यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभापतींसह, सदस्य आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. Rajendra Maske leaves for Mumbai to meet Pankaja Munde

तर या नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के Rajendra Mask हे पंकजा मुंडेंच्या Pankaja Munde भेटीसाठी मुंबईला MUmbai रवाना झाले आहेत. ते याविषयावर पंकजा मुंडे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यांच्याबरोबर उद्या मुंबईत पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील होणार आहे.

हे देखील पहा -

या राजीनामा सत्राविषयी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना माहिती दिली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाराजगीचा सुरू असून आणखीनही राजीनामे येण्याची शक्यता आहेअशी माहिती दिली आहे. त्यामुळे पाटील आता या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढतात कशी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Rajendra Maske leaves for Mumbai to meet Pankaja Munde

दरम्यान, या राजीनामा सत्रात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या जयश्री मस्के यांचाही समावेश आहे. त्यामुळे राजेंद्र मस्के यांच्याही निर्णयाकडे लक्ष वेधले असून भाजप पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजीनामासत्र! बीड जिल्हाध्यक्ष पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना
वसमतच्या अमितने स्विकारले कावळ्याच्या अनाथ चिमुकल्यांचे पालकत्व

पंकजा मुंडे या सध्या दिल्लीमध्ये आहेत. यावेळी मुंडे यांनी राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत भाग घेतला. त्यानंतर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. पंकजा यांनी उद्या मुंबईमध्ये समर्थकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना राजीनामे मागे घेण्याच्या सूचना करण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com