राजेश टाेपे म्हणाले, कोल्हापूरची स्थिती नक्कीच गंभीर; पण...

राजेश टाेपे म्हणाले, कोल्हापूरची स्थिती नक्कीच गंभीर; पण...
rajesh tope

कोल्हापूर : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टाेेपे rajesh tope आज (शुक्रवार) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (rajesh-tope-kolhapur-corona-update-marathi-news)

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पाेलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, कोल्हापूर महापालिका आयुक्त कादंबरी बलकावडे आणि जिल्हा परिषद सीईओ संजय चव्हाण आदी उपस्थित हाेते.

दरम्यान काेल्हापूर जिल्ह्यातील दुकाने साेमवारी खूली हाेतील असे संकेत आराेग्य मंत्री राजेश टाेपेंनी दिले आहेत. आज व्यापा-यांनी मंत्री टाेपेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काेविड 19 च्या अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीत मंत्री राजेश टाेपे यांनी संपुर्ण काेल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर प्रशासनास महत्वपुर्ण सूचना केल्या.

माध्यमांशी बाेलतना आराेग्य मंत्री राजेश टाेपे म्हणाले काेविड बाबत कोल्हापूरची परिस्थिती नक्कीच गंभीर आहे. पण त्यात सुधारणा होत आहे हे देखील महत्वाचं आहे. लसीकरणाचा कोल्हापूर पॅटर्न इतर जिल्ह्यातील उद्योजकांनी केला पाहिजे. खासगी आणि औद्योगिकसाठीचा कोटा जास्तीत जास्त कसा मिळवता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर त्याच बरोबर पॉझिटिव्हीटी रेट जास्त असलेल्या ठिकाणी लसीकरणाला झुकत माप देऊ अशी ग्वाही दिली.

टाेपे म्हणाले रुग्णांचा ट्रॅकिंग करणं हा बेस आहे. तो अधिक जास्त प्रमाणात करावा अशी सूचना केली. यापु्र्वी उपमुख्यमंत्री अजित आणि मी बैठक घेतली होती. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर सूचनांचे पालन केल्याचं दिसत आहे. ही समाधानाची बाब आहे.

rajesh tope
शिवसैनिकाचा खून; एनसीपीच्या माजी पदाधिका-याच्या पतीवर गुन्हा

आता आठवड्यात 86 हजार तपासणी हाेताहेत. सध्या काेविड 19 पॉझिटिव्हीटी रेट 9.06 पर्यंत आला आहे. त्यामूळे जिल्हा 4 सत्रातून तिस-या क्रमांवर आला आहे. जुलै संपे पर्यंत हा रेट नॉर्मल होईल ही अशा बाळगूयात. सध्या मृत्यूदर सुद्धा कमी झाल्याचे टाेपेंनी नमूद केले. गृहविलगिकरण कमी करण्यात आले आहे.गृह विलगिकरणातील व्यक्तीला दिवसातून दोन फोन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे मृत्यू दर कमी होईल असा विश्वास मंत्री टाेपे यांनी व्यक्त केला आहे.

लाॅकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यावर मंत्री टाेपे म्हणाले आठवड्याचे परिणाम आले आहेत आता यावरुन पुढचा निर्णय होईल. जुलै ऑगस्ट मध्ये कोल्हापूरमध्ये पूर येतो. त्या दृष्टीने नियोजन केलं आहे. पूर येणाऱ्या 171 गावात लसीकरणावावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात जास्त संसर्ग असणाऱ्या ठिकाणी लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचे मंत्री टाेपेे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात 17 ऑक्सिजन प्लँट जुलै अखेर सुरू होतील. हे प्लँट राज्याच्या दृष्टीने देखील उपयोगी पडतील. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन जास्त लागेल असे सूतोवाच पंतप्रधान मोदी यांनी व्हीसीमध्ये केले आहेत.

जरी तिसरी लाट आली तरी उद्योग बंद राहू नयेत यासाठी मालकांनी कामगारांच लसीकरण केलं पाहिजे. सीएसआर फंड यासाठी वापरता येऊ शकतात. केंद्रिय कमिटीने काही सूचना केल्या आहेत. त्याची राज्यात अंमलबजावणी करणार आहोत.

कंटेन्मेंट झोनमध्ये नियम कडक करण्याची गरज आहे. दोन डोस झालेल्या लोकांना ही लागण झाली आहे. याचे वय काय,किती दिवसांनी लागण झाली याचा डेटा तयार करणार त्याचे स्याम्पल तपासणीसाठी देणार रिपोर्ट यायला वेळ लागू नये यासाठी विशेष बाब म्हणून पुण्यात टेस्टला परवानगीसाठी मी आरोग्य विभागाच्या सचिवांना सांगितलं आहे.

तिस-या लाटेच्या पार्श्वभुमीवर काेविड 19 च्या मार्गदर्शक तत्वांच्या जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यावर भर द्या अशा सुद्धा सूचना दिल्या आहेत. नुकत्याच आधिवेशनात कोविड संदर्भात 1222 कोटी रुपये तिसऱ्या लाटेसाठी मंजुरी घेतली आहे. 500 रुग्णवाहिकासाठी सुद्धा लवकरच निधी ऑक्सिजन दुप्पट किंवा टिप्पट लागू शकते त्याची ही तरतूद करत आहोत.

राज्यात डॉक्टर नाहीत असे चित्र नसेल

राज्यात 9 हजार 46 म्युकर मायकाेसिसचे रुग्ण आहेत. पाच हजार रुग्णावर मोफत उपाचार केले आहेत. आरोग्य विभागाच्या 100 टक्के जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात 1 हजार डॉक्टर भरले उर्वरीत एक हजार लवकरच भरणार आहाेत. त्यामुळे डॉक्टर नाहीत अशी अवस्था आता राज्यात नसेल. गट क आणि ड ची 10 हजार पदे सुद्धा दोन महिन्यात भरणार आहाेत.

पंतप्रधान मोदी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ऑक्सिजन सुद्धा काही प्रमाणात उपलब्ध करून देण्याची आग्रहपूर्वक मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. गर्दी होणारे कार्यक्रम टाळा अशा सूचना मोदींनी दिल्या आहेत.तिसऱ्या लाटेचा धोका त्यांनी ही व्यक्त केला.

दरम्यान कोल्हापूरची परिस्थिती नक्कीच गंभीर आहे.पण त्यात सुधारणा होत आहे हे देखील महत्वाचं आहे. लसीकरणाचा कोल्हापूर पॅटर्न इतर जिल्ह्यातील उद्योजकांनी केला पाहिजे. खासगी आणि औद्योगिकसाठीचा कोटा जास्तीत जास्त कसा मिळवता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर त्याच बरोबर पॉझिटिव्हीटी रेट जास्त असलेल्या ठिकाणी लसीकरणाला झुकत माप देऊ अशी ग्वाही मंत्री टाेपे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com