शाळांबाबत राजेश टोपेंचं मोठं विधान; सुप्रिया सुळेंच्या विनंतीला मान!

राज्यातल्या शाळांबाबत बुधवारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.
Supriya Sule & Rajesh Tope
Supriya Sule & Rajesh TopeSaam TV

जालना: शाळांबाबत बुधवारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याचा स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचा विचार करत असल्याचं टोपेंनी सांगितले आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) शाळांबाबत केलेल्या विनंतीवर टोपे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. लसीकरणाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये लसीकरणाची सक्ती नाही तर ऐश्चिक आहे. संपूर्ण लसीकरण करून घेण्याची राज्याची तयारी असल्याचे टोपे म्हणाले आहेत. (Rajesh Tope On School Opening)

राज्यातल्या शाळांबाबत बुधवारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे, ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. जिथे कोरोनाचे रुग्ण नाहीत त्याठिकाणी शाळा सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरू लागलीये. त्याचबरोबर याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही शाळा सुरु करण्याची विनंती केली आहे. त्यामुळं येत्या बुधवारच्या कॅबिनेटमध्ये शाळेबाबत चर्चा होणार असून स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचा विचार आहे असं टोपे यांनी म्हंटलंय. मात्र संपूर्ण राज्याचं लसीकरण करून घेण्याची तयारी सरकारची आहे. त्यामुळं लसीकरणाच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असेही आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com