... अखेर नाराज मोदींचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश (पहा व्हिडीओ)

जिल्ह्यात काँग्रेस टिकवून ठेवण्यात मोदींचा सिंहाचा आहे.
राजकिशोर मोदी NCP
राजकिशोर मोदी NCPविनोद जिरे

बीड : गेल्या अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत कुरघोड्याने नाराज असणाऱ्या काँग्रेसच्या पापा मोदींनी, (Congress) अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये NCP जाहीर प्रवेश केला आहे. बीड जिल्ह्यात काँग्रेस टिकवून ठेवण्यात मोदींचा सिंहाचा आहे. गेल्या 15-20 वर्षांपासून अंबाजोगाई नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा मोदींनी फडकवलेला आहे. मात्र आज नाराज झालेल्या राजकिशोर उर्फ पापा मोदींनी आपल्या असंख्य समर्थकांसह, मुंबई येथे अजित पवारांच्या Ajit Pawar उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

पहा व्हिडीओ -

गेल्या अनेक वर्षांपासून पापा मोदी हे काँग्रेसमध्ये होते या काँग्रेसला अंबाजोगाई नगरपालिकेच्या (Ambajogai Municipality) माध्यमातून त्यांनी बर देखील दिला संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत वर इतर पक्ष्यांची सत्ता असताना त्यांनी अंबाजोगाई नगरपालिका आपल्या हातून जाऊ दिली नाही यामुळे त्यांना काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीदेखील देण्यात आली मात्र जिल्हाध्यक्ष पदावर काही काळ झाल्यानंतर त्यांचा या पदावरून पायउतार केला त्यांच्या जागी काँग्रेसच्या राजेसाहेब देशमुख यांना ही जबाबदारी मिळाली यामुळे पापा मोदी हे नाराज झाले हे नाराज खदखद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली होती मात्र ही नाराजगी दूर करण्यामध्ये काँग्रेससह काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार रजनीताई पाटील यादेखील अपयशी ठरल्या.

राजकिशोर मोदी NCP
"समीर वानखेडे हा भाजपचा म्होरक्या, तो बोगसगिरी करतो"

आज अखेर बीड जिल्ह्यात कॉंग्रेसचा गड राखून ठेवणाऱ्या पापा मोदींनी, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. दरम्यान राष्ट्रवादीच्या हातून भाजपने BJP काबीज केलेल्या केज विधानसभा मतदार संघावर भाजपची 2 टर्मपासून सत्ता आहे. त्यामुळं पुन्हा एकदा केज विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी पापा मोदींचा मोठा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com