राजश्री मुंडे यांच्या हस्ते दीड हजार महिलांना ई-श्रम कार्डचे वाटप

यात तब्बल दीड हजार महिलांना कुंकूमार्चन पुजाथाळीचे वाटप करण्यात आले. सोबतच राजश्री मुंडेंच्या हस्ते दीड हजार महिलांना ई-श्रम कार्डचेही वाटप करण्यात आले.
राजश्री मुंडे यांच्या हस्ते दीड हजार महिलांना ई-श्रम कार्डचे वाटप
राजश्री मुंडे यांच्या हस्ते दीड हजार महिलांना ई-श्रम कार्डचे वाटपविनोद जिरे

बीड: परळीत सप्तश्रुंगी दुर्गोत्सव मंडळाने महिलांसाठी अनोखा उपक्रम राबवला. यात तब्बल दीड हजार महिलांना कुंकूमार्चन पुजाथाळीचे वाटप करण्यात आले. सोबतच राजश्री मुंडेंच्या हस्ते दीड हजार महिलांना ई-श्रम कार्डचेही वाटप करण्यात आले. (Rajshri Munde distributes e-labor cards to one and a half thousand women)

हे देखील पहा -

बीडच्या परळीमध्ये सप्तशृंगी दुर्गा सेवाभावी संस्थेच्या वतीने, नेहमी सामाजिक कार्यक्रम घेतले जात असतात. तर गेल्या दीड वर्षानंतर पहिल्यांदाच शासनाच्या वतीने सण-उत्सव साजरे करण्याची मुभा दिल्याने यंदा देखील अनोख्या पद्धतीने सप्तशृंगी दुर्गा मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. आज नवरात्र महोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील दीड हजार महिलांना कुंकूमार्चन पुजाथाळी वाटप करण्यात आल्या आहेत. तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते दीड हजार महिलांना ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

राजश्री मुंडे यांच्या हस्ते दीड हजार महिलांना ई-श्रम कार्डचे वाटप
मलंगगड आणि परिसरात ललिता पंचमी उत्साहात साजरी...

दरम्यान नगरसेवक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक देशमुख यांच्या कल्पनेतून महिलांसाठी ही एक प्रकारची मेजवाणीचं होती. त्यामुळे या नेत्रदीपक कार्यक्रमामुळे महीलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.