Raju Shetti News : देशात झुंडशाही, गलिच्छ राजकारण सुरु आहे : राजू शेट्टी

शेतीमालाचा दर हा प्रामुख्याने केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून असतो असे राजू शेट्टींनी नमूद केले.
Raju Shetti News in Marathi, Political News
Raju Shetti News in Marathi, Political Newssaam tv

सांगली : सध्या देशात झुंडशाही चालली आहे. गलिच्छ राजकारण सुरु आहे. हे पाहून आज आमच्या मनाला वेदना होताहेत. कुणीही कुठल्याही जातीचा असो त्याला या देशात मोकळेपणाने राहता आला पाहिजे. मोकळेपणाने श्वास घेता आला पाहिजे मग काश्मीरमधला पंडित असो किंवा अगदी महाराष्ट्रातला अल्पसंख्यांक असो असे राजू शेट्टी यांनी येथे (sangli) नमूद केले. (Raju Shetti news in Marathi)

दरम्यान स्वभिमानी शेतकरी संघटनेने आता सगळ्याच पक्षापासून चार हात लांब राहायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांचे जनमत पुन्हा मिळवू असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatna) संस्थापक माजी खासदार राजू शेट्टींनी (raju shetti) व्यक्त केला.

शेट्टी म्हणाले केंद्र सरकारने (central government) शेतकऱ्यांवर (farmers) अन्याय केला. राज्य सरकारने देखील त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आता आघाडी असो किंवा युती या सगळ्यांपासून आम्ही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. रासायनिक खताचे दर गगनास भिडलेत.

Raju Shetti News in Marathi, Political News
संजय बियाणींच्या पत्नीचा दिरावर संशय; विमानतळ पाेलीसांत गुन्हा दाखल

पुणतांब्यात उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर पूर्ण होतील का या प्रश्नावर शेट्टी म्हणाले शेती आणि शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न हे केंद्र सरकारच्याच धोरणांत लपलेले आहेत. राज्य सरकारचा त्यात सहभाग फार कमी आहे. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न हे शेतीमालाच्या दरामध्ये लपलेली आहेत आणि शेतीमालाचा दर हा प्रामुख्याने केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून असतो. त्यामुळे पुणतांब्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून फार काही निष्पन्न होईल असे वाटत नाही.

Edited By : Siddharth Latkar

Raju Shetti News in Marathi, Political News
कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? मग कशासाठी 'हा' आटापिटा : सदाभाऊ खाेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com