Latur : शिवारातला आक्रोश थांबवा, अन्यथा झाडाला लटकलेली प्रेतं दिसतील : शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्याला मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त भागाला भेट दिली आहे.
Latur : शिवारातला आक्रोश थांबवा, अन्यथा झाडाला लटकलेली प्रेतं दिसतील : शेट्टी
शिवारातला आक्रोश थांबवा, अन्यथा झाडाला लटकलेली प्रेतं दिसतील : शेट्टीदीपक क्षीरसागर

लातूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्याला मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त भागाला भेट दिली आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केलीय.

हे देखील पहा :

ज्या शेतकऱ्यांने कोरोना महामारीच्या काळात शेतशिवारात काबाडकष्ट करून भाजीपाला शहरात पोहचवला तोच शेतकरी आज संकटात आहे. त्याला तातडीने मदत देणे गरजेचे आहे, पण राज्य सरकारला शिवारातील शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही. जर तातडीने मदत दिली गेली नाही तर शिवारातील झाडाला प्रेतं लटकलेली दिसतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवारातला आक्रोश थांबवा, अन्यथा झाडाला लटकलेली प्रेतं दिसतील : शेट्टी
Nandurbar : नवापूर तालुक्यात तुफान पाऊस; नदी नाल्यांना पूर!

शेतकऱ्यांना पीकविमा देण्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका संशयास्पद आहे. खोटे अहवाल तयार करायचा, मूठभर अधिकाऱ्यांना लाच द्यायची आणि नुकसान भरपाई नाकारायची असे धोरण आहे. त्यामुळे या विमा कंपन्याना वर्षाला 5 हजार कोटींचा काय 10 हजार कोटीचा नफा होणारच असेही ते म्हणाले. मग या कंपन्या कोणासाठी आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या विमा कंपन्या शेतकऱ्यांसाठी की कार्पोरेट कल्याणासाठी आहे यात अनेकांचे हात ओले होत आहेत, अशी सडकून टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.