नेता येण्यापुर्वीच कार्यकर्त्याने मारली कृष्णा नदीत उडी अन्...

krishna River
krishna River

काेल्हापूर : पूरग्रस्तांना मदत मिळालीच पाहिजे अशी आराेळी ठाेकत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने पंचगंगा परिक्रमा आंदोलनातील जलसमाधी आंदाेलन हा टप्पा यशस्वी करण्यासाठी आैरवाडच्या पूलाखाली जाऊन नदीत krishna River उडी मारली. पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त असून देखील कार्यकर्त्याने उडी मारल्याने एकच धावपळ उडाली. दरम्यान बचाव कार्य पथकाने आंदाेलकास पाण्या बाहेर काढले.

krishna River
Paralympics : १९ पदकांवर माेहाेर उमटविणारे हे आहेत चॅम्पियन्स

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी raju shetti यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३५ ते ४० हजारांचा जथ्था नृसिंहवाडी येथे दाखल हाेत आहे. दरम्यान शेट्टी येण्यापुर्वीच एका कार्यकर्त्याने कृष्णा नदीत उडी मारली. या कार्यकर्त्यास बचाव कार्य पथकाने पाण्याच्या बाहेर काढले.

पाेलिसांचा बंदाेबस्त असताना कार्यकर्त्याने नदीत मारलेली उडी ही सरकारच्या कामकाजाच्या निषेर्धात असल्याचे सांगितलं जात आहे. पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत ही ताेकडी आहे आणि त्यांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राजू शेट्टींनी पंचगंगा परिक्रमा आंदाेलनास पाच दिवसांपुर्वी प्रारंभ केला आहे. आज ते येथे बसस्थानकाजवळ सभा घेऊन पुढची दिशा ठरवतील अशी शक्यता वर्तवली गेली.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com