त्यांनी शब्द दिला; वाडीत जाताच भुमिका जाहीर करु : राजू शेट्टी

त्यांनी शब्द दिला; वाडीत जाताच भुमिका जाहीर करु : राजू शेट्टी
raju shetti

सांगली/कोल्हापूर : आमच्या सत्यागृहात काेठेही अडथळा येणार नाही अथवा करणार नाही असा शब्द आम्हांला जिल्हाधिकारी आणि पाेलिस अधीक्षकांनी दिला आहे. दाेघेही माझ्याशी सकाळपासून संपर्कात आहेत. आम्ही देखील त्यांना नृसिंहवाडी येथे जाताना आमच्याकडून काेणताही अनुचित प्रकार घडणार नाही असा शब्द दिला आहे. आम्ही तेथे पाेहचल्यानंतर भुमिका जाहीर करु असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टींनी raju shetti panchganga parkrima latest update नमूद केले.

पूरग्रस्तांना तातडीने सरकारने मदत द्यावी यासाठी गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंचगंगा परिक्रमा हे आंदोलन सुरू आहे. आज (रविवार) पाचव्या दिवशी नृसिंहवाडी इथे सर्व आंदोलक सरकारच्या विरोधात जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर केल आहे. त्यानुसार स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हजाराे शेतक-यांसह दुपारी तीन वाजता कुरुंदवाड या भागात पाेहचले हाेते. त्यावेळी त्यांनी आपली भुमिका ठाम असून प्रशासनाने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यास आम्ही संमती दिली आहे.

दरम्यान नृसिंहवाडी आणि परिसरात पोलिसांचा माेठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या भागात बहुतांश महत्वाच्या ठिकाणी बॅरेकेट्स लावण्यात आले आहे. नृसिंहवाडीला जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी शिरोळ पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. कृष्णा नदीचे पात्र खोल असल्याने जलसमाधी आंदोलन केल्याने जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे जलसमाधी आंदोलन करायला कोणालाही प्रवृत्त करू नका असे पोलिसांनी नोटीसात नमूद केले आहे.

raju shetti
Paralympics : १९ पदकांवर माेहाेर उमटविणारे हे आहेत चॅम्पियन्स

दरम्यान या भागात काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. या बराेबरच स्थानिक प्रशासनाने चार बाेटी उपलब्ध केल्या आहेत. या भागात काेणते ही हिंसक आंदाेलन हाेऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेताहेत. कृष्णा आणि पंचगगा या नद्यांचे हा संगम आहे. गनिमी काव्याने आंदाेलन हाेऊ शकते याचा अंदाज असल्याने माेठ्या संख्येने या भागात पाेलिस बंदाेबस्त लावण्यात आला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com