Raju Shetti News : हे प्रकरण तुम्हांला महागात पडल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना इशारा

बारसू प्रकल्पास स्थानिकांचा विराेध असेल तर हा प्रकल्प हाेऊ देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टींनी जाहीर केली.
Raju Shetti, Barsu Refinery Project, Ratnagiri News
Raju Shetti, Barsu Refinery Project, Ratnagiri Newssaam tv

Barsu Refinery Project Latest Update : रिफायनरी प्रकल्प कुणाच्या सांगण्यावरून रेटला जातोय ? कोकणातील शेतकऱ्यांनी आंदोलन करून नाणार हद्दपार केला. आता बारसूबाबतही लोकांचा तीव्र विरोध आहे. स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही. कोणाची तरी सुपारी घेऊन जमिनी हडप करण्याचा प्रयत्न झाला तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा इशारा देतो हे प्रकरण तुम्हाला महागात पडेल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी सरकारला बारसूच्या आंदाेलकांवरील कारवाईनंतर सुनावलं आहे. (Maharashtra News)

Raju Shetti, Barsu Refinery Project, Ratnagiri News
Rajaram Sahakari Sugar Factory Election Results : करशील काय नाद... हाेशिल बाद ! महादेवराव महाडिक यांचा विजय असाे, काेल्हापूरात जल्लोष सुरु

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणाला विराेध करणा-यांवर आज आंदोलनाचा दुस-या दिवशी पाेलिसांच्या बळाचा वापर करण्यात आला. त्यामुळे पाेलिस आणि आंदाेलकांमध्ये हमरीतुमरी झाली. खून झाला तरी चालेल, मेलाे तरी चालेल आम्ही लढणार मागे हटणार नाही अशी भूमिका बारसू प्रकल्पाला विराेध करणा-या ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर पाेलिसांनी सुमारे 25 महिलांना ताब्यात घेतले. (Breaking Marathi News)

Raju Shetti, Barsu Refinery Project, Ratnagiri News
Shivendraraje News : शेतक-यांच्या व्यथा.. देवस्थानच्या जमिनींमुळे पीक कर्ज मिळेना : मार्ग काढण्याचे शिवेंद्रराजेंचे मुख्यमंत्र्याना आवाहन

या घटनेचा राजकीय नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यानंतर उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी बारसूबाबतची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाची भूमिका दुटप्पी असल्याचे नमूद केले. त्यामुळे बारसूच्या वादात आणखी एक राजकीय ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Raju Shetti, Barsu Refinery Project, Ratnagiri News
Sangli Crime News : माय-लेकीचा निर्घृण खून, पाेलिस तपास सुरु

दरम्यान स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी बारसूच्या विराेधात एकवटलेल्या महिला, पुरूषांवर दडपशाहीचा वरंवटा फिरवून माती परिक्षण करण्याचा घाट पोलिसांनी का घातला आहे, पोलिसांना यामध्ये इतका रस का आहे असा सवाल शेट्टींनी केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com