चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर जलमय!
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर जलमय!संजय तुमराम

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर जलमय!

राजुरा शहरातील रामपूर भागात अनेक दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आणखी पावसाची शक्यता असल्याने पोलीस व महसूल प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे

चंद्रपूर : चंद्रपूरहून हैद्राबादकडे जाणारा महामार्ग बंद झाला आहे. या आंतरराज्यीय महामार्गावर लक्कडकोटजवळील नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका राजुरा शहराला बसला असून संपूर्ण शहर जलमय झाले आहे. पुराचे पाणी महामार्गावर आल्याने राजुरा ते गडचांदूर मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

हे देखील पहा -

चंद्रपुरातील रामपूर-गोवरी मार्गावरही पाणी आल्याने हा मार्ग सुद्धा ठप्प झाला आहे. पोलीस व महसूल प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून राजुरा शहरातील आमराई वार्ड, साईनगर, रामपूर आदी भागात पाणी साचले आहे. गडचांदूर मार्गावरील भवानी माता मंदिरजवळील नाल्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर जलमय!
पिंपरी-चिंचवड मधील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली

राजुरा शहरातील रामपूर भागात अनेक दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आणखी पावसाची शक्यता असल्याने पोलीस व महसूल प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. वाहतुकीत फसलेल्या सर्व सामान्य जनतेचे मात्र चांगलेच बेहाल झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com