
कोल्हापूर: राज्यसभा निवडणुकीत (Election) कोल्हापुरच्या धनंजय महाडिकांनी विजय मिळवला. या विजयाची चर्चा राज्यात सुरू आहे. भाजपचे (BJP) नवनिर्वाचीत खासदार धनंजय महाडिक आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. महाडिक आज मुंबईहून कोल्हापुरला जात असताना कराड येथे महामार्गावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांची भेट झाली. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर (Social Media) अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत धनंजय महाडिक यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. रस्त्यावरच धनंजय महाडिक यांनी राजू शेट्टींचे आशीर्वाद घेत असताना वाकुन नमस्कार करत असल्याचे दिसत आहे. या साधेपणाचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे.
कराड येथील पंकज हॉटेल येथे कोल्हापूरकडे निघालेले नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांना भेटून बाहेर पडत असताना, तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे हॉटेलमध्ये निघाले होते. यावेळी पुणे -बेंगलोर महामार्गावर राजू शेट्टी हे गाडीतून खाली उतरताच धनंजय महाडिक हे आपल्या गाडीतून तात्काळ खाली उतरत राजू शेट्टी यांच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतले.
आज धनंजय महाडिक यांची कोल्हापुरात विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीचे मोठे आयोजन केले आहे.
यावेळी राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत आमच्या जवळचा व जिल्ह्यातला उमेदवार निवडून आल्याने आनंद आहे. धनंजय हे आमचे मित्र आहेत. सध्या आम्ही भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांच्यापासून लांब आहोत, स्वतंत्र आहोत. त्यामुळे एका मित्राचा विजय झाल्याने आनंद होत आहे.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.