मोठी बातमी! राज्यसभेचं मतदान सुरू होताच महाविकास आघाडीने आखला नवा प्लॅन

आतापर्यंत भाजपच्या 20 आमदारांनी मतदान केलं आहे.
मोठी बातमी! राज्यसभेचं मतदान सुरू होताच महाविकास आघाडीने आखला नवा प्लॅन
Uddhav Thackeray News, Rajya Sabha Election 2022 NewsSaam Tv

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला (Rajya Sabha Election voting) सुरूवात झाली आहे. आतापर्यंत भाजपच्या 20 आमदारांनी मतदान केलं आहे. अशातच महाविकास आघाडीने नवा प्लॅन आखला आहे. पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीचे 42 आमदार मतदान करणार आहे. तर, बाकी मतं राखून ठेवणार आहे. दुपारी एकूण मतदानाचा आढावा घेऊन उर्वरित मतं ही शिवसेनेचे संजय पवार यांना दिली जाणारा आहे. (Rajya Sabha Election 2022 Latest Marathi News)

Uddhav Thackeray News, Rajya Sabha Election 2022 News
आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान; सहाव्या जागेसाठी मोठी चुरस, निकालाकडे लक्ष

विशेष बाब म्हणजे, आज सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांना मतदानाबाबत पत्रकारांनी विचारलं असता, पहिल्याच फटक्यात आमचे चारही उमेदवार निवडूण येणार असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र आता त्यांनी नवा डाव खेळला आहे. पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीचे 42 मतदार हे मतदान करणार आहे. तसेच इतर मतं ही राखून ठेवण्यात येणार आहे. (Uddhav Thackeray News)

सविस्तर सांगायचं झालं तर, कॉंग्रेसकडे जी 44 मतं आहे यापैकी 42 मतं आपल्या उमेदवाराला देईल, त्यानंतरची उरलेली 2 मतं ही राखून ठेवण्यात येईल. राष्ट्रवादीकडे 53 मतं आहेत यातील पहिली 42 मतं ते प्रफुल्ल पटेल यांना देणार असून 9 मतं राखून ठेवणार आहे. तर शिवसेनेकडील 56 मतांपैकी अगोदर 42 मतदार मतदान करणार आहे. तर उरलेली मतं ही राखून ठेवण्यात येणार आहे.

Uddhav Thackeray News, Rajya Sabha Election 2022 News
Rajya Sabha Election: मतदानासाठी आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईत येणार

दरम्यान, दुपारच्या टप्प्यात सर्व पोलिंग एजंट मतांचा आढावा घेणार आहे. नेमकी आपली किती मतं झाली. आपलं कुठलंही मतं वाया गेलं नाही ना... याची खात्री केली जाणार आहे आणि त्यानंतर तिनही पक्षाकडे उरलेली जी अधिकची मतं आहे, ती सर्वच मतं शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला म्हणजेच संजय पवार यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे मतांचे व्यवस्थित नियोजन होईल, आणि आपले चारही उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा महाविकास आघाडीला आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. अशातच अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी दोनही पक्षांना अपक्ष व छोट्या पक्षांची गरज लागणार आहे. अपक्ष व छोट्या पक्षांचे २९ आमदार असून, ते कोणती भूमिका घेतात यावर शिवसेना व भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com