राज्यसभेच्या रिंगणात नव्या उमेदवाराची एन्ट्री; मतांसाठी आमदारांना TATA Safari ची ऑफर

निटूरे यांनी त्यांच्या या ऑफरबाबत फेसबुक व इतर माध्यमातून पोस्ट केली आहे
Arun Niture Offer Tata Safari
Arun Niture Offer Tata SafariSaam Tv

उस्मानाबाद : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून (Rajya Sabha Election) राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. एकीकडे सहाव्या जागेसाठी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas aghadi) रस्सीखेच सुरू असतानाच आता दुसरीकडे राज्यसभेच्या रिंगणात आणखी एक उमेदवार उतरला आहे. या उमेदवाराने मत देणाऱ्या आमदारांना चक्क टाटा सफारी (TATA Safari) गाडीची ऑफर दिली आहे. राज्यसभेत जो आमदार मला मतं देईल त्याला टाटा सफारी गाडी देण्यात येईल अशी ऑफर राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे यांनी आमदारांना दिली आहे.

Arun Niture Offer Tata Safari
ठरलं! अखेर हार्दिक पटेल भाजपचं कमळ हाती घेणार; 2 जूनला होणार पक्षप्रवेश

राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे हे आज (मंगळवारी) मुंबई विधानभवन येथे राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत निटूरे यांना आमदारांनी सहकार्य केल्यास त्यांना प्रत्येकी एक टाटा सफारी गाडी भेट म्हणून देणार असल्याची त्यांची घोषणा आहे. निटूरे यांनी ४५ सफारी गाड्यांचे कोटेशन सुद्धा घेतले असून प्रती गाडी २६ लाखप्रमाणे ११ कोटी ८१ लाख खर्च करणार आहेत.

निटूरे यांनी त्यांच्या या ऑफरबाबत फेसबुक व इतर माध्यमातून पोस्ट केले आहे. त्यांच्या या ऑफरला कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, निटूरे यांनी यापूर्वी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणूक लढविली होती. त्यानंतर ते आता राज्यसभा निवडणुकीसाठीही अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

Arun Niture Offer Tata Safari
'पुढील २५ वर्ष उद्धव ठाकरे…'; सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज्यसभा निवडणुकीतील कुणाकडे किती संख्याबळ?

सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदारांचं वजन भाजपकडे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com