राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव; अभंग ट्विट करत संभाजीराजेंचा सेनेला टोला

राज्यसभेची सहावी जागा कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं.
Sambhaji Raje vs Sanjay Raut Rajya Sabha
Sambhaji Raje vs Sanjay Raut Rajya SabhaSaam Tv

मुंबई : राज्यसभा निवडणुक (Rajya Sabha Election 2022) अपेक्षेपेक्षा अतिशय रंगतदार झाली. राज्यसभेची सहावी जागा कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. या जागेवर भाजपने (BJP) विजय मिळवला असून भाजपचे कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा मोठा विजय झाला आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवार विजय झाले. आता या विजयावरून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला (Shivsena) चिमटा काढला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज सकाळी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला. (Rajya Sabha Election Result Shivsena Latest news)

Sambhaji Raje vs Sanjay Raut Rajya Sabha
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष आमदाराचा भाजपवर गंभीर आरोप

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला, असा आरोप संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. आता धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वाघाची कातडी ओढून वाघ होता येत नाही, अशी खरमरीत टीका संभाजीराजे छत्रपतींनी तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ट्विट करत शिवसेनेवर केली आहे.

राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होती. शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यात सहाव्या जागेसाठी स्पर्धा होती. अतिशय प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपने सहावी जागा जिंकत शिवसेनेसह महाविकास आघाडीला मोठा झटका दिला. महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असताना देखील अनेक मतं फोडून भाजपने धनजंय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणलं.

दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संभाजीराजेंनी अप्रत्यक्षपणे अभंगाच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे. विशेष बाब म्हणजे, संजय पवार यांच्याआधी शिवसेनेनं संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणूकीची ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे अपक्ष लढवण्यावर ठाम राहिले. यामुळे शिवसेनेने कोल्हापूरमधील पक्षाचे नेते संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली होती. तसंच शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींवरही निशाणा साधला होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com