
मुंबई : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी आज म्हणजचे शुक्रवारी मतदान होणार आहे. २४ वर्षानंतर राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारे मतदान होत असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होणार असा आरोप सत्ताधाऱ्यांसह (Shivsena) विरोधकांनी (BJP) एकमेकांवर केला होता. त्यामुळे प्रत्येकाने आपआपले आमदार एका सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. दरम्यान, या निवडणुकीत नेमका कोणता पक्ष बाजी मारणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Rajya Sabha Eection 2022 Latest Updates)
आज राज्यसभेच्या जागांसाठी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होणार आहे. तर संध्याकाळी ५ वाजेपासून मत मोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. मात्र एका आमदाराचं निधन झालं आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना कोर्टाने मतदानाचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे २८५ मतदार सहा जागांसाठी मतदान करतील.
राज्यसभा निवडणुकीत एक-एक आमदाराचं मत महत्वाचं ठरणार आहे. अशातच निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने आघाडीचे दोन मतांचे गणित बिघडले आहे. दुसरीकडे या मतांची कमतरता ते अपक्ष आमदारांच्या मतदानावरून भरून काढतील अशी अपेक्षा होती. मात्र, हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते महाविकासआघाडीला मिळतील याबाबत सांशकता आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. अशातच अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी दोनही पक्षांना अपक्ष व छोट्या पक्षांची गरज लागणार आहे. अपक्ष व छोट्या पक्षांचे २९ आमदार असून, ते कोणती भूमिका घेतात यावर शिवसेना व भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.
MIM च्या मतांना देखील प्रचंड महत्त्व
एमआयएम आणि शिवसेना यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे एमआयएमचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा मिळणं कठीण आहे. त्यामुळे एमआयएमची दोन मतं काँग्रेस, राष्ट्रवादीला मिळतील आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करेल, असा तोडगा निघत असल्याचं दिसत आहे. यासाठी एक पत्रक काढलं जाईल. त्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव असेल. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं नाव नसेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.