मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष आमदाराचा भाजपवर गंभीर आरोप

राज्यसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष आमदाराचा भाजपवर गंभीर आरोप
Devendra FadnavisSaam Tv

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) ६ पैकी ३ जागा जिंकत भाजपने जोरदार मुसंडी मारली. पुरेशी मतं नसताना देखील भाजपने (BJP) अतिशय अनपेक्षितरित्या आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्याचा चमत्कार घडवला. महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) पुरेसं संख्याबळ असताना देखील अनेक मतं फोडून भाजपने धनजंय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणलं. दरम्यान, भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आल्यानंतर अमरावतीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी गंभीर आरोप केला आहे. (Rajya Sabha Election Result 2022 Latest News)

Devendra Fadnavis
आमचे महाडिक संजय राऊतांपेक्षाही जास्त मतांनी विजयी; फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलं

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने ईडी, सीबीआयचा दबाव टाकून आपल्याकडे मतं वळवली. त्यामुळे हा केंद्रीय तपास यंत्रणांचा विजय आहे. असा आरोप अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट टाकून केला आहे. देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदार संघाचे अपक्ष आमदार आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. भाजपने यात तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. निकालात भाजपचे तिनही उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही अपक्ष आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं. दरम्यान, निकालानंतर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

दुसरीकडे, सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "भाजपने जागा जिंकली, पण भाजप विजयी झालं नाही" असा टोला लगावत "निवडणूक आयोगाने त्यांना (भाजपला) फेव्हर केलं आणि आमचं मत बाद केलं." असा गंभीर आरोप त्यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्यानंतर आता देवेंद्र भुयार यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com