Rajya Sabha Election: फाईव्ह स्टार हॉटेल सोडून संजय गायकवाड यांचा आमदार निवासात मुक्काम...

एवढ्या पैशाच्या उधळपट्टीला नाकारून गायकवाड यांनी जमिनीवर असल्याचा प्रत्यय दिलाय
Sanjay Gaikwad News, Rajya Sabha Election 2022 News
Sanjay Gaikwad News, Rajya Sabha Election 2022 NewsSaam Tv

मुंबई - राज्यसभेची निवडणूक गाजत असताना इतर पक्षा प्रमाणे शिवसेनेने (Shivsena) सुद्धा मुंबई येथील फाईव्ह स्टार ट्रायडंट हॉटल मध्ये सर्व आमदार ठेवले होते. शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी त्या महागड्या हॉटल मधील होणारी पैशाची उधळपट्टी पाहून मतदार संघातील आपला साधा माणूस कश्या पद्धतीने जगत आहे हे त्यांच्या मनाला न पटणारे होते. (Rajya Sabha Election 2022 News)

हे देखील पाहा -

आमदार गायकवाड यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेतली व मी आमदार निवास येथे जाऊन मुक्काम करतो तसेच येथील होणारा खर्च हा न पटणारा आहे यावर चर्चा केली व शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड या एकट्या आमदाराने हॉटल ट्रायडंट हॉटल सोडले आमदार निवासात जाऊन मुक्काम केला. त्यांच्या या कृतीने मुख्यमंत्री व शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले असून जमिनीवरच असल्याचा प्रत्यय गायकवाडांनी दिला आहे.

Sanjay Gaikwad News, Rajya Sabha Election 2022 News
Rajya Sabha Election: महाविकास आघाडीतला एक संजय नक्की जाणार; अनिल बोंडेंचा रोख नेमका कोणाकडे?

ट्रायडंट हॉटेलमध्ये एका रुमचं एका दिवसाचं भाडं सुमारे 16 हजार रुपये आहे. म्हणजेच एक दिवसाचा खर्च 11 लाख 20 हजार रुपये आहे. पक्षाने चार दिवसांसाठी या हॉटेलमध्ये रुम बुक केल्या आहेत. म्हणजेच चार दिवसाचा खर्च जवळपास 44 लाख 80 हजार रुपये एवढा आहे. शिवसेनेने या हॉटेलमध्ये 70 रुम बुक केल्या आहेत. ज्यात पक्षाच्या आमदारांसह अपक्ष आमदारांचाही समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com