अकोल्यात रक्तयज्ञ आंदोलन; दिल्लीतील आंदोलनात मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली!
अकोल्यात रक्तयज्ञ आंदोलन; दिल्लीतील आंदोलनात मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली!SaamTvNews

अकोल्यात रक्तयज्ञ आंदोलन; दिल्लीतील आंदोलनात मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली!

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 'रक्तयज्ञ' या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

अकोला : अकोल्यात शेतकरी जागर मंचच्या वतीने रक्तयज्ञ आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 'रक्तयज्ञ' या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचा एक थेंब रक्तयज्ञात टाकला. यावेळी शंभरच्या वर आंदोलकांनी रक्तदान केले.

हे देखील पहा :

विशेष म्हणजे या आंदोलनात किन्नरांनीही उस्फुर्त सहभाग नोंदवला. 26 नोव्हेंबरला शेतकरी आंदोलनाला एक वर्ष होत आहे. कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तरी सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासने पाळली नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

अकोल्यात रक्तयज्ञ आंदोलन; दिल्लीतील आंदोलनात मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली!
बाब्बो जीवंत व्यक्तीला दाखवलं कोरोना मयत; आरोग्य विभागाचा प्रताप!

तर, तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान 759 शेतकऱ्यांचा जीव गेला त्यासाठी शेतकरी जागर मंच तर्फे रक्तयज्ञ अर्थात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Edited By : Krushnarav sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com