Ramjan Eid: राज्‍यभरात रमजान ईद साजरी; मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत केली प्रार्थना

राज्‍यभरात रमजान ईद साजरी; मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत केली प्रार्थना
Ramjan Eid: राज्‍यभरात रमजान ईद साजरी; मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत केली प्रार्थना
Ramjan EidSaam tv

मुंबई : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद निमित्ताने आज राज्‍यातील विविध शहरातील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांतर्फे सामुहीक नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण करत देशात एकता व अखंडता टिकून रहावी; यासाठी प्रार्थना केली. (Ramadan Eid celebrations across the state Muslim brothers prayed while praying)

मुस्लिम धर्मगुरूंनी धुळे (Dhule) शहरातील सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांना सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू व मुस्लिम बांधवांमधील एकता व अखंडता टिकून रहावी यासाठी प्रार्थना केली. नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत गळेभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यामध्ये चिमुकल्यांचा देखील सहभाग असल्याचे दिसून आले आहे.

Ramjan Eid
Jalgaon: उन्हाचा परिणाम; ११५ टक्के पाऊस तरीही तीन गावांना टँकरने पाणी

नांदेडमध्ये नमाज अदा

रमजान ईदनिमित्त नांदेड (Nanded) शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पवित्र अशा रमजान महिन्यातील रोजे म्हणजेच उपवास संपल्यानंतर आणि मागील दोन वर्ष कोरोना काळातील निर्बंधांनंतर आज नमाज अदा करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्र आले होते. ईदगाह मैदानावर एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केले.

अमरावतीत ‘ईद-उल-फित्र’ उत्साहात

मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण चांदूर रेल्वे शहरात मंगळवारी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने आलेल्या मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करत अल्लाहला साकडे घातले. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईदगाहजवळ येऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

अकोल्यात सामूहिक नमाज पठण

मुस्लिम समाजाचा वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या रमजान ईदचा अकोल्यात (Akola) अनोखा उत्साह पाहायला मिळाला. अकोल्यातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यावेळी हजारो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्‍या शुभेच्छा...

अहमदनगरच्या संगमनेर येथे ईदनिमित्य ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ईदनिमित्त संगमनेरच्या ईदगाहा मैदानावर जाऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

हिंगोलीत अनोखी ईद

मुस्लिम समाजाचा वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या रमजान ईदचा हिंगोलीत अनोखा उत्साह पाहायला मिळाला आहे, मुस्लिम बांधवांनी हिंगोली नांदेड महामार्गावर असलेल्या ऐतिहासिक ईदगाह मैदानावर सकाळी सामूहिक नमाज पठण केल्यानंतर हिंदू बांधवांनी गळाभेटी घेत मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांच्या उत्साहात बंदोबस्तावर असलेल्या हिंगोली पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या हर्षोल्हासात सहभाग घेतला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.