रामदास आठवलेंची कवितेतून उद्धव आणि राज ठाकरेंवर टीका

राज ठाकरे भोंगेवरून तुमची दादागिरी योग्य नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवलेंची कवितेतून उद्धव आणि राज ठाकरेंवर टीका
Ramdas AthwaleSaam Tv

सांगली: मनसेच्या (MNS) मशिदीवरील भोंगे आंदोलनावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज ठाकरेंवर राज्यातील काही नेते टीका करत आहेत. तर भाजपकडून या भूमिकेचे समर्थन होतं आहे. तर आरपीआयचे रामदास आठवले यांनी मनसेच्या भोंगा मुद्द्याला विरोध केला आहे. आज आठवले (Ramdas Athawale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कवितेतून टीका केली आहे. 'राज ठाकरे भोंगेवरून तुमची दादागिरी योग्य नाही. आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले पाप पण सुखाने नांदा होऊ देऊ नका वांदा', अशी कवीतेतून रामदास आठवले यांनी टीका केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कवितेतून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. मनसेने भोंग्यावरुन सुरु केलेल्या आंदोलनावर बोलताना आठवले म्हणाले, 'विनाकारण का काढता तुम्ही भोंगे. कशासाठी करता अशी सोंगे. एवढ्या दिवसापासून भोंगे वाजतात. एक दोनवेळा भोंगे वाजतात, मग का काढता भोंगे. मुस्लिम समाज हिंदू होता. मोघल याठिकाणी आले आणि आपले हिंदू समाजाचे लोक मुस्लिम झाले. इंग्रज आले आणि दीडशे वर्ष राहिले आणि आपले लोक ख्रिश्चन झाले, असं रामदास आठवले म्हणाले.

Ramdas Athwale
Ramdas Athawale : शरद पवारांच्या मताशी मी असहमत - रामदास आठवले

'तुम्हाला भोंगा आवतड नसेलतर भीम जयंती, गणेश उत्सव यावेळी त्यांना त्रास होत नाही का. तुम्हाला अजाण ऐकायचे नसेलतर ऐकू नका. अशा पद्धतीने दादागिरी योग्य नाही. अशी टीका रामदास आठवले यांनी केली. रामदास आठवले (Ramdas Athawale) आज सांगलीतील आटपाडीमध्ये निर्धार मेळाव्यात बोलत होते.

बाळासाहेब ठाकरे यांनी भीम शक्ती आणि शिव शक्ती अशी भूमिका मांडली. मी काँग्रेस पक्षात होतो. शरद पवार साहेबांच्या सोबत होतो. पण मला हरवले आणि मी ठरवले आणि भीम शक्ती आणि शिव शक्ती झाली. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते आणि सत्ता आली. मी जेव्हा काँग्रेसमध्ये होतो तेव्हा त्यांना सत्ता मिळाली होती. मी त्यांना सोडल्यावर त्यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले, असंही आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

हे देखील पाहा

शिवसेनेवर टीका

शिवसेनेने (Shivsena) पाप केले आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली. आता मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळाले आहे. पण मुख्यमंत्रीपद मिळाले असलेतरी ते एका चक्रव्यूहात आहेत. एका बाजूला काँग्रेस दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आहे. मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.. पण काही जमत नाही पण ठीक आहे. तुम्ही त्या ठिकाणी सुखी राहा नांदा पण होऊ देऊ नका वांदा, अशी कवीतेतून टीका आठवले यांनी केली.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.