छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चाललो तर...! ; राष्ट्रपतींचा विश्वास

या दौर्‍याचे दरम्यान राष्ट्रपती महोदयांनी प्रथम होळीच्या माळावारील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर दौऱ्याच्या शेवटी शिव समाधीचे दशन घेतले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चाललो तर...! ; राष्ट्रपतींचा विश्वास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चाललो तर...! ; राष्ट्रपतींचा विश्वासSaam TV

राजेश भोस्तेकर

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना किल्ले रायगडावरून केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर चाललो तर 21 व्या शतकात स्वराज्याची प्रति कल्पना आपण साकारू शकतो असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज किल्ले रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल. यावेळी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांना दांडपट्टा, भवानी तलवार, अज्ञापत्राची प्रत आणि शिवकालीन होणची प्रतीकृती भेट दिली.

या दौर्‍याचे दरम्यान राष्ट्रपती महोदयांनी प्रथम होळीच्या माळावारील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर दौऱ्याच्या शेवटी शिव समाधीचे दशन घेतले. राजसदर येथे छोटेखान कार्यक्रमात राष्ट्रपती महोदयांचा आदर सत्कार छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून करण्यात आला. यावेळी राष्ट्रपतींनी शिव छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि देशातील पहिल्या नौदलाच्या स्थापनेबद्दल कौतुकोद्गार काढले.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com