भानगडी सोडून द्या, दानवेंच्या 'त्या' वक्तव्याला अर्जुन खोतकरांचा टोला

Arjun Khotkar : दानवे यांनी केलेल्या वक्तव्याला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी प्रत्युत्तर देत चांगलाच टोला हाणला आहे
भानगडी सोडून द्या, दानवेंच्या 'त्या' वक्तव्याला अर्जुन खोतकरांचा टोला
Raosaheb Danve vs Arjun KhotkarSaam Tv

जालना: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे. 3 मे रोजी जालना (Jalna) येथे झालेल्या परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना "मला एका ब्राह्णाला राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे," असे वक्तव्य दानवेंनी केले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. अशातच दानवे यांच्या या वक्तव्याला शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Shivsena Arjun Khotkar यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Raosaheb Danve vs Arjun Khotkar
मी राज्याचा मुख्यमंत्री ब्राम्हण असलेला पाहू इच्छितो; दानवेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधान

रावसाहेब दानवेंनी आपल्या भाषणात ब्राह्मण समाजातील व्यक्तीला महाराष्ट्राचे नेतृत्व देण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्या कार्यक्रमात अर्जुन खोतकर देखील उपस्थित होते. दरम्यान, दानवे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी टोला हाणला. "आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील ब्राह्मण समाजातील आहेत. यापूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, ते देखील ब्राह्मण समाजातीलच होते. त्यामुळे, दानवे यांनी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करू म्हणण्याची भानगड सोडून द्यावी. आताचे मुख्यमंत्री तेच आहेत. देवेंद्र फडणवीस होतील तेव्हा होतील" असंही खोतकर म्हणाले.

जालन्यात 3 मे रोजी परशुराम जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील किनगावकर यांनी केली. यावर बोलताना 'ब्राह्मण समाज सर्व समाजाला दिशा देणारा आहे. केवळ नगरसेवक, नगराध्यक्ष या पदांवर काम करणाऱ्या ब्राह्मण समाजाला आता आपण पाहू नये. अशा एवढ्या छोट्या अपेक्षा व्यक्त करू नका. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,' असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.