रावसाहेब दानवेंचं मंत्रीपद शाबूत; विरोधकांना पुन्हा "चकवा"

२०१४ मध्ये रावसाहेब दानवे यांना मोदी मंत्रिमंडळात अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं.
रावसाहेब दानवेंचं मंत्रीपद शाबूत; विरोधकांना पुन्हा "चकवा"
केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवेSaam Tv

जालना: काल मोदी सरकारच्या (Modi Government) बहुचर्चित मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्याआधी दिग्गज नेत्यांचं राजीनामा सत्र देखील पार पडलं. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या दरम्यान जालन्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या राजीनाम्याचीही अफवा उठली आणि कार्यकर्त्यांत नाराजी पसरली. तर दानवे यांच्या जालन्यातील विरोधकांमध्ये उत्साह दिसून आला.

मात्र माझा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असं स्पष्टीकरण दानवे यांनी दिल्यानं जालन्यातील दानवे यांच्या विरोधकांना चांगल्याच मिरच्या झोंबल्याची चर्चा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे.

केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे
महाराष्ट्राचे लाडके म्हणतं, lil champs ना मिळाली प्रेक्षकांची नापंसती

२०१४ मध्ये रावसाहेब दानवे यांना मोदी मंत्रिमंडळात अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र ९ महिन्यांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र तरीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना नाराज केलं नाही त्यांच्यावर सलग दोन वेळा भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवला. त्यानंतर पुन्हा भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर त्याच विभागाचं राज्यमंत्रीपद त्यांना सोपवण्यात आलं.

मात्र आता झालेल्या मोदी मंत्रीमंडळ विस्तारात दानवे यांच्याकडे असलेल्या खात्यात बदल करण्यात आला असून त्यांच्याकडे रेल्वे, कोळसा आणि खाण मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे महत्वाचे खाते मिळाल्यानं दानवे यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच आनंद पसरला असून दानवे यांनी पुन्हा विरोधकांना "चकवा" देत चेकमेट केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगतांना दिसत असल्याने विरोधकांत नाराजी पसरली आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com