जमलं नाही तर कुस्ती..., एकत्र निवडणुका लढवण्याच्या सत्तारांच्या आवाहनाला दानवेंचे प्रत्युत्तर

स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू - रावसाहेब दानवे
Abdul Sattar Vs Raosaheb Danve
Abdul Sattar Vs Raosaheb DanveSaam TV

जालना: जमलं तर भाई-भाई, नाही जमलं तर कुस्ती खेळू स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलं आहे. जालन्यात सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपनं मैत्रीपूर्ण लढत करावी असं आवाहन कालं केलं होतं. सत्तारांच्या याच वक्तव्यावर दानवेंनी प्रतिउत्तर दिलं आहे. दानवे म्हणाले, जमलं तर भाई-भाई, नाही जमलं तर कुस्ती खेळु स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू आणि या निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येवून जिल्हा परिषद नगरपरिषद ताब्यात घेवू असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

पाहा व्हिडीओ -

त्याचबरोबर ज्या त्या जिल्ह्यावर निर्णय सोडला असून सत्तार आणि आम्ही बसू जमलं तर भाई भाई नाही तर कुस्ती असं दानवेंनी म्हंटल्यामुळे शिंदे गट आणि भाजप हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की वेगवेगळ लढणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, आजच्या आरोग्य शिबिरात अधिकाऱ्यांना दानवेनी खडेबोल सुनावले आहेत. जालना आरोग्य विभागाच्या वतीने आज जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्तीती आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या कर्यक्रमाला रुग्णाणी पाठ फिरवल्याने आरोग्य विभागणी आयोजकांनी चक्क शक्कल लढवत अंगणवाडी सेविका आणि आशा ताई वर्कर यांना रुग्ण म्हणून दाखवण्यात आलं.

Abdul Sattar Vs Raosaheb Danve
Electric Bike: इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; सात वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाराजी व्यक्त करत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या शिबिरात आरोग्य कर्मचाऱ्या शिवाय कुणी दिसत नाही, कधी रुग्णांसाठी देखील आरोग्य शिबीराचे आयोजन करा.

आजचा मेळावा फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी होता अस समजून चालू असं म्हणत, कधी-कधी रुग्णासाठीही आरोग्य मेळावा घ्या त्यासाठी लागलं तर माझ्या विभागाकडून मी निधी उपलब्ध करू देतो असा टोला ही यावेळी आयोजकांना लगावला आहे.त्यामुळे इतका खर्च करून ही आरोग्य मेळाव्याला रुग्णाणी पाठ फिरवल्याने जिल्हा आरोग्य विभागाचे ढिसाळ कारभार समोर आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com