Breaking : भोंदू मनोहरमामाला पुणे ग्रामीण पोलिसांनी केली अटक

एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करत तिच्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्याम मनोहर मामाला काही वेळापूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
Breaking : भोंदू मनोहरमामाला पुणे ग्रामीण पोलिसांनी केली अटक
Breaking : मनोहर मामावर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखलविश्वभूषण लिमये

मंगेश कचरे/विश्वभूषण लिमये

बारामती : भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याला पोलिसांनी घेतलं आहे. साताऱ्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले याला ताब्यात घेतल्याचं पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितलं. सध्या मनोहरमामाच्या अटकेची प्रक्रिया सुरु असून त्याला बारामतीला नेलं जाणार आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि श्रध्देचा बाजार मांडणाऱ्या मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले याचा पर्दाफाश झालाय. कारण एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करत तिच्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कथित महाराज मनोहर भोसले याच्यासह त्याचे साथीदार नाथ बाबा उर्फ विशाल वाघमारे आणि वैभव वाघ या तिघांवर भादंवि कलम 376, 385, 506 तसेच जादुटोणा विरोधी प्रतिबंधक कायदा 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याच्या तपास करमाळा पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी मनोहर मामा हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी तीन पथकं रवाना झाली आहेत.

Breaking : मनोहर मामावर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल
One Plus च्या स्मार्टफोनचा खिशात स्फोट; तरुण जखमी

पिडीत महिला ही आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामाच्या आश्रमात आली होती. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिघांनी तिची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार केला. त्याचबरोबर तिच्याकडून पैसेदेखील उकीळण्यात आल्याचे पिडितेने आपल्या फिर्यादीत दिले आहे. त्यामुळे आता कथित मनोहर मामा उर्फ मनोहर भोसलेवर पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com