बर्थडे पार्टीला गेलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर; कोल्ड्रिंक्समधून गुंगीचं औषध दिलं अन्...

Kalyan Crime : पीडिता नशेत असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला
Kalyan Crime
Kalyan CrimeSaam Tv

कळवा : आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर 3 वर्ष अत्याचार करणाऱ्या नराधमाला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. गणेश उर्फ जितु अशोक सुरवसे (वय ३३) असं नराधम आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडित तरुणीला आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर 3 वर्ष अत्याचार केला. इतकंच नाही तर, जेव्हा या तरुणीचं लग्न ठरलं, तेव्हा तिच्याच नावे एक सोशल मीडियावर अकाऊंट ओपन करत इतरांसोबत चॅटिंग सुरू केली. त्यानंतर पीडित तरुणीला अनोळखी व्यक्तीचे कॉल आणि मॅसेज येऊ लागले. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अखेर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Kalyan Crime
रागाने बघितले म्हणून इसमाची हत्या; नागपुरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, काही आरोपी गणेश याने पीडित तरुणीला आपल्या वाढदिवसानिमित्त दिवा येथील घरी बोलावलं. त्यानंतर तिला शीतपेय असल्याचं सांगत अल्कोहोल मिश्रित द्रव्य पाजले. त्यानंतर पीडिता नशेत असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. इतकंच नाही तर, आरोपीने पीडित तरुणीसोबत अत्याचार करताना व्हिडिओ आणि फोटोही काढले. जेव्हा तरुणीला जाग आली तेव्हा आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिला कळाले. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त करत पीडिता आपल्या घरी निघून गेली. दरम्यान काही दिवसांनी आरोपीने पीडित तरुणीला तिच्यासोबत अतिप्रसंग करतानाचे व्हिडिओ आणि फोटो पाठवण्यास सुरूवात केली. तसेच व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

पुढे याच व्हिडिओचा फायदा घेत आरोपीने २०१९ ते २०२२ या तीन वर्षाच्या कालावधीत पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार केला. तिच्यावर वेळोवेळी जबरदस्ती संभोग केला. इतकंच नाही तर,जानेवारी २०२२ मध्ये फिर्यादी तरुणीचे लग्न ठरले होते. याची माहिती या नराधमाला मिळाल्यानंतर त्याने पीडित तरुणीच्या नावाने सोशल मिडीयावर बनावट खाते तयार केले. त्या अकाऊंटवर फोटो आणि व्हिडिओ टाकत पीडितेची बदनामी सुरू केली. इतक्यावर हा नराधम थांबला नाही. तर, त्याने पीडितेच्या नावावर इतरांना अश्लिल मॅसेज केले. त्यानंतर पीडितेला अनोळखी व्यक्तीचे कॉल आणि मॅसेज येऊ लागले. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर पीडितेने नराधमाच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा केला.

दरम्यान, पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी गणेश सुरवसे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी सुरवसे हा मूळ माळशिरस, सोलापूर येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला असता, तो सतत मोबाईल क्रमांक बदलत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गोवा असे वेगवेगळे ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, तो गोवा येथे आल्याचे कळताच कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतलं आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी या नराधमाला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com