नाशिकमध्ये दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाला मिळाले जीवदान

पतंगप्रेमींनी नायलॉन मांजा वापरु नये, असे कळकळीचे आवाहन सोसायटीतील नागरिकांनी केलं आहे.
नाशिकमध्ये दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाला मिळाले जीवदान
नाशिकमध्ये दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाला मिळाले जीवदान saam tv

सागर गायकवाड

नाशिकच्या (Nashik) रविशंकर मार्गावरील हरीस्मृती हौसिंग सोसायटीतील लोकांनी एका दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाला जीवदान दिल्याची माहिती समोर आली आहे. शिवम तांबे या तरुणाने या दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाचे (Rare species of owl) प्राण वाचवले आहेत. याबाबत शिवमने स्वतः माहिती दिली. (Rare species of owl gets life in Nashik)

नाशिकमध्ये दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाला मिळाले जीवदान
माना, श्रीहरी आणि साजन यांची टोकियो ऑलम्पिकसाठी निवड

शिवमकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास सहाव्या मजल्याच्या गँलरीतुन समोरच्या डिशच्या केबलला मांज्यात अडकलेला एक पक्षी दिसला. दुरून तो पक्षी म्हणजे साळुंकी असावा अस वाटत होत. त्या पक्ष्याची सुटण्यासाठी धडपड चालू होती. ते पाहून शिवमने दोने तीन पक्षी मित्रांना फोन केले पण पक्षी उंचावर अडकलेला असल्याने त्यांनी असमर्थता दर्शविली.

त्यानंतर शिवमने नाशिक महानगर पालिकेच्या फायर ब्रिगेड विभागाला फोन केला. काही वेळातच म्हणजे पुढच्या चार ते पाच मिनीटात फायर ब्रिगेडची टिम घटना स्थळी दाखल झाली. टीमने त्या उंचावर अडकलेल्या पक्षाची सुटका केली. ते एक दुर्मीळ प्रजातीच घुबड होत. महापालिकेच्या रेस्क्यू टिमने आणि कर्मचा-यांच्या तत्परतेने एक दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाचे प्राण वाचले. हे पाहून सोसायटीतील नगरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला. इतकेच नव्हे तर, माणसाप्रमाणे पशुपक्ष्यांचेही प्राण अनमोल आहेत. त्यामुळे पतंगप्रेमींनी  नायलॉन मांजा वापरु नये, असे कळकळीचे आवाहन ही त्यांनी केलं आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com