Video: एका उंदरामुळे अख्या औरंगाबादकरांच्या तोंडाचं पाणी पळवलं; वाचा नेमकं काय घडलं?

नवीन योजना सुरू करण्यास ११ तास लागले
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

औरंगाबाद - शहराचा पाणीपुरवठा एका उंदराने तब्बल १३ तास बंद पाडला. औरंगाबाद (Aurangabad) शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या जायकवाडीत पंपगृहातील मॅनहोलमध्ये उंदीर शिरल्यामुळे स्पार्किंग होऊन सोमवारी पहाटे वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे नवीन आणि जुन्या योजनांवरील पाणी उपसा बंद पडला. अखेर बायपासद्वारे जुन्या योजनेवरील पाणी उपसा दोन तासांच्या खंडानंतर सुरू करण्यात आला. (Aurangabad Latest News)

मात्र, नवीन योजना सुरू करण्यास ११ तास लागले. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पंपगृह उंदीरमामांनी बंद पाडल्यानं १३ तास पाण्याचा उपसा बंद झाल्यामुळे शहरातील अनेक भागात कालपासून निर्जळीचा सामना करावा लागतोय. त्याचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असल्यानं शहरातला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागतील, असा अंदाज आहे.

Aurangabad News
Emraan Hashmi : काश्मीरमध्ये इमरान हाश्मीवर दगडफेक; आरोपीला अटक

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्ने काही केल्या थांबायला तयार नाहीत. कधी जलवाहिनी फुटते तर कधी तांत्रिक अडचण निर्माण होते. सोमवारी मध्यरात्री २ वाजता जायकवाडी पंपगृहातील पंप क्रमांक ४ च्या फिडरमध्ये उंदीरमामा घुसले. शॉर्टसर्किटमुळे त्यांनी ट्रान्सफॉर्मरच खराब केले. दुरुस्तीसाठी तब्बल १३ तास लागले. शहराला १४०० आणि ७०० व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होतो.

मागील आठवड्यात ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी बिडकीनजवळील फरशी फाटा येथे फुटली होती. दुरुस्तीसाठी तब्बल ३० तास लागले होते. यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच दोन दिवसांपूर्वी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात पंपात तांत्रिक बिघाड झाला. या दोन घटनांमुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com