'Uddhav Thackeray जनतेच्या भावनांशी खेळले'

देशातील राजकारण्यांचे सर्वाेच्च न्यायालयातील महाराष्ट्राच्या निकालाकडे लक्ष लागून राहिलं आहे.
Ramdas Kadam, Uddhav Thackeray, Ratnagiri, Supreme Court,
Ramdas Kadam, Uddhav Thackeray, Ratnagiri, Supreme Court, saam tv

Ramdas Kadam On Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेशी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे खेळलेत. केवळ मुख्यमंत्रीपदाची हाैस भागविण्यासाठी त्यांनी पद स्विकारले. राज्यातील काेणत्याही संकट काळात ते माताेश्रीतून बाहेर पडले नाहीत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) शिवसेना गटाचे माजी आमदार रामदास कदम (ramdas kadam) यांनी ठाकरेंवर केली (Maharashtra News)

Ramdas Kadam, Uddhav Thackeray, Ratnagiri, Supreme Court,
Morcha To Oppose Barsu Refinery : 'रिफायनरी हटवा काेकण वाचवा'; काेकणात वाड्यांवर रिफायनरी विराेधकांचा माेर्चा

सर्वाेच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा अंतिम निकाल (Maharashtra's Political Crisis) आहे. त्या पार्श्वभूमीवर रामदास कदम बाेलत हाेते. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये कुठल्याही न्यायालयाने हस्तक्षेप केलेला नाही. विधिमंडळ ही साहित्य संस्था आहे. न्यायव्यवस्था आहे ते कायदेमंडळ आहे, म्हणून तिथेच कायदेच पण बनवतात. त्या न्याय व्यवस्थेवर आजपर्यंत कोणीही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे आज जर निकाल लागला तर आत्ताच्या अध्यक्षांकडे तो निर्णय सोपवतील कारण हे विधिमंडळाच्या अंतर्गत बाब आहे. सर्व निर्देशांच्या असल्याने हा निर्णय अध्यक्षांकडे जाईल असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले.

Ramdas Kadam, Uddhav Thackeray, Ratnagiri, Supreme Court,
Satara Crime News : पुण्यात राहणा-या सहाय्यक दुय्यम निबंधकाने साता-यात घेतली लाच; ACB ने घेतलं ताब्यात

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले शिंदेंनी मुख्यमंत्री पदासाठी लायक नसलेल्या (उद्धव ठाकरे) माणसाला खाली उतरवलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही क्रांती केली. सध्या शिंदे आणि फडणवीस या दाेघांचे चांगले काम सुरु आहे असेही कदम यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com