Sai Resort Scam Case: साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक

ED Action Dapoli Resort : दापोलीतील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे.
ED Action Dapoli Sai Resort
ED Action Dapoli Sai ResortSaam TV

ED Action Sai Resort: दापोलीतील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर ईडीने तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक केली आहे. त्यांच्यावर साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका. ठेवण्यात आला आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळखळ उडाली आहे. (Latest Marathi News)

ED Action Dapoli Sai Resort
Parbhani Accident News : भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू, मन सुन्न करणारी घटना

जयराम देशपांडे हे दापोलीतील तत्कालीन प्रांताधिकारी आहेत. ईडीने अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने कारवाईचा बडगा उचलला आहे. विशेष बाब म्हणजे अगदी चार दिवसांपूर्वीच उद्योजक सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती.

चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे धाकटे बंधू आहेत तसेच ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेसाठी सदानंद कदम यांनी मोठी ताकद लावल्याचं बोललं गेलं. सभा पार पडून आठवडा उलटत नाही तोच संजय कदम यांना ईडीने बेड्या ठोकल्याने उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली होती.

ED Action Dapoli Sai Resort
Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेवर मधमाशांचा हल्ला, पुणे-बंगलोर महामार्गावरील घटना

दरम्यान, सदानंद कदम यांच्यानंतर आता ईडीने या प्रकरणात तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना सुद्धा ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचं शासनाकडून निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती. पदावर असताना अनियमितता आरोपाखाली देशपांडे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. या कारवाईनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली होती.

किरीट सोमय्या सगळ्यांना उद्धवस्त करण्यासाठीच बसले आहेत. साई रिसॉर्टशी माझा राजकीय संबंध जोडून मला राजकीय बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तो राजकीय खेळीचा भाग आहे. पण अन्य ज्यांची काही घरं आहेत, काही लोकांची छोटी छोटी स्टक्चर आहेत. तीही यात उध्वस्त होती, यांची जबाबदारी किरीट सोमय्या घेणार का? असा सवाल करत ते म्हणाले की, याला सरकार आणि सोमय्यांना जबाबदार धरलं जाईल असंही अनिल परब म्हणाले होते.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com