रवी भाेसले टाेळीस लागला माेका; तिघे अटकेत, दाेघे फरार

रवी भाेसले टाेळीस लागला माेका; तिघे अटकेत, दाेघे फरार
arrest

सांगली : गेल्या सात वर्षांपासून नागरिकांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण करणा-या रवी भाेसले याच्या टाेळीस पाेलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायदान्वये (माेका) Maharashtra Control of Organised Crime Act कारवाई केली आहे. या टाेळीतील पाच पैकी तिघांना पाेलिसांनी अटक arrest केली आहे.

मिरज ग्रामीण पोलिस ठाणे आणि मिरज गांधी चाैकी हद्दीत सातत्याने या टाेळीकडून नागरिकांना त्रास देण्यात येत असतं. रवी भोसले हा या टोळीचा प्रमुख आहे. गेल्या सात वर्षांपासून ही टोळी कार्यरत आहे. जबरी चोरी, दरोडा, खुनी हल्ला असे गुन्हे टाेळीवर दाखल आहेत. नागरिकांवर स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता दहशत निर्माण करण्याचे प्रकार टाेळीने केले आहेत.

arrest
दोन कटाप्पांनी बाहुबलीला मारले; जठारांचा मंत्र्यांवर राेख

पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी वाढती गुन्हेगारी राेखण्यासाठी जिल्हा पाेलिस दलास विशेष सूचना केल्या हाेत्या. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातील पाेलिस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी या टाेळी विरुद्ध माेकाचा moka act प्रस्ताव सादर केला हाेता. हा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक परीक्षेत्र कोल्हापूर मनोज लोहिया यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यास लाेहिया यांनी मंजूरी दिली.

त्यानूसार रवी भोसले, सिराज उर्फ किरण शिसफुल भोसले, पल्ली उर्फ प्रवीण गंगाराम काळे, आनंदा रामा काळे, अक्षय शहाजी काळे या पाच जणांच्या टाेळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. यापैकी पाेलिसांनी तिघांना अटक केली आहे अन्य दाेघांचा शाेध सुरु आहे अशी माहिती तपासी अधिकारी अशोक वीरकर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com