राजकीय पाेळी भाजण्याचे काम यशाेमती ठाकूरांनी केले : रवी राणा
ravi rana yashomati thakur

राजकीय पाेळी भाजण्याचे काम यशाेमती ठाकूरांनी केले : रवी राणा

ठाकूर यांच्या विराेधात आंदाेलन छेडू असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे.

अमरावती : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी औरंगाबाद येथे केलेल्या वक्तव्यामुळे काही शिवसैनिकांनी इथं येऊन गोंधळ घातला. तसंच अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे हे कारस्थान असल्याचा गंभीर आरोप बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी येथे केला. या गाेंधळाचा राजकीय फायदा व्हावा यासाठी पालकमंत्री यशाेमती ठाकूर यांनी राजकीय पाेळी भाजून घेतल्याचा आराेप राणा यांनी केला. मुख्यमंत्री यांनी नैतीकतेच्या आधारे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचं राजीनामा घ्यावा अशी मागणीही राणा यांनी केली. mla ravi rana demands resignation of yashomati thakur amravati

ravi rana yashomati thakur
'या' विधानसभा मतदारसंघातून सोनू सूदची बहीण लढणार निवडणूक

आमदार रवी राणा म्हणाले चार ते पाच दिवसांपासून अमरावती येथे तणावाचे वातावरण आहे. संपुर्ण अमरावती शहरात माेठ्या संख्येने पाेलिस तसेच एसआरपीएफ आहे. शिवसैनिकांनी येथे येऊन माेठ्या प्रमाणात शहरात गाेंधळ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्याला खासदार संजय राऊत हे जबाबदार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री यशाेमती ठाकूर यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु. तसेच ठाकूर यांच्या विराेधात आंदाेलन छेडू असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com