Amravati News: अमरावती लोकसभा मतदारसंघावर शिंदे गट दावा करणार; नवनीत राणांविरुद्ध अडसूळ मैदानात?

Amravati News Today: अमरावती लोकसभेत पुन्हा आनंदराव अडसूळ हे शिंदे शिवसेना गटाकडून निवडनुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलं आहे.
Amravati News
Amravati NewsSaam Tv

अमर घटारे

Amravati Political News: येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट दावा करणार असल्याचं माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी आज अमरावती येथे पत्रकार परिषदेत घेऊन सांगितलं. यासोबतच अमरावती लोकसभा सह अमरावती जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार यापूर्वी निवडून आले त्या सर्व जागेवर आम्ही दावा करणार व अमरावती लोकसभेत पुन्हा आनंदराव अडसूळ हे शिंदे शिवसेना गटाकडून निवडनुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलं आहे. (Latest Marathi News)

Amravati News
Bhyandar D-Mart Fire: रजा नाकारल्याने तरुणीला राग अनावर; थेट डी-मार्टमध्येच लावली आग, खळबळजनक घटना!

रवी राणा यांची प्रतिक्रिया

अमरावती (Amravati) लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा ह्या नवडणूक लढतील. अभिजित अडसूळ व आनंदराव अडसूळ हे त्यांचा प्रचार करतील व एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा प्रचार करतील त्यामुळे कोणी कितीही दावे केले तर त्याला काही अर्थ नाही अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिली.

आता अमरावती लोकसभेवर विद्यमान खासदार नवनीत राणा व शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दावा केल्याने लोकसभेच्या तिकीटसाठी रस्सीखेच होताना दिसून येत आहे. यापूर्वी नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा करत आनंदराव अडसूळ यांनी राणा दाम्पत्याला कोर्टात खेचल होत.

Amravati News
Bacchu Kadu News: सचिन तेंडुलकरच्या त्या जाहिरातीवर तात्काळ बंदी घाला; आमदार बच्चू कडूंचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

राणा आणि अडसूळ यांचा वाद टोकाला गेला होता. आता शिंदे शिवसेना गट,भाजप,राष्ट्रवादी या तिघांना रणा यांना केंद्रात आणि राज्यात पाठिंबा असताना कोणाला अमरावती लोकसभेची तिकीट मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com