Nashik : बहिणीवर एकतर्फी प्रेम, भावास संपवलं; नाशकातील पंचवटी परिसरात युवकाचा खून

पाेलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.
Police Investigation Nashik
Police Investigation NashikSaam Tv

Nashik Crime News : नाशिक शहरात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास युवकावर (youth) प्राणघातक हल्ला. हल्ल्यात रवी सलीम सय्यद (वय 18 रा. फुलेनगर) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोन संशयितांचा पाेलिस (police) शाेध घेताहेत. (Nashik Panchwati Latest Marathi News)

या घटनेबाबत अधिक मिळालेली माहिती अशी - रवी याच्यावर वार केलेल्यांपैकी एकाचे त्याच्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने रवीच्या बहिणीला पळवण्याची आणि रवीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर शनिवारी वाद उकरून काढत संशयितांनी धारदार शस्त्रा रवीवर चाल केली. त्यात रवीचा मृत्यू झाला.

ही घटना मायको दवाखान्याजवळ घडली. पंचवटी पोलिस संशयितांचा शोध घेताहेत. रवी सय्यद याचा मृतदह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात रवी याच्या नातेवाईकांची गर्दी झाली हाेती. पाेलीस या घटनेचा कसून तपास करीत असल्याचे पाेलीस दलानं नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Police Investigation Nashik
'बाप्पा' च्या विसर्जनासाठी गेलेल्या सहा वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू; नातेवाईकांचा महापालिकेवर राेष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com