Ravikant Tupkar News : मंत्र्यांना विमा कंपन्यांकडून पैसे जातात; रवीकांत तुपकरांचा माेदी सरकारवर गंभीर आराेप

20 नोव्हेंबरला बुलढाण्यात सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा महामोर्चा काढणार असल्याचे तुपकरांनी नमूद केले.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSaam tv

- चेतन व्यास

Wardha News : विमा कंपनी आणि सरकारच साटलोट आहे. हजारो कोटी रुपये या विमा कंपनी जमा करतात, सरकारमधल्या मंत्र्यांना याचे पैसे जातात. केंद्र सरकार सुद्धा यात शामिल आहे. पीक विमा कंपन्याचा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा आहे. सरकार यात अंदरसे शामिल हैं. तेरी भी चूप और मेरीभी चूप असे असून वरवर हे सर्व बोलतात. यामुळे दहा वर्षाच पीक विमा कंपनीचे टेस्ट ऑडिट केले पाहिजे अशी माझी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar latest marathi news) यांनी केली आहे. (Maharashtra News)

Ravikant Tupkar
Kojagiri Purnima 2023 : आजपासून चार दिवस सोलापूर- तुळजापूर मार्ग वाहनांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

तुपकर यांनी 20 नोव्हेंबरला बुलढाण्यात होणाऱ्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या महामोर्चा करीता राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. दरम्यान त्यांनी वर्धेत पत्रकारांशी संवाद साधला. तुपकर म्हणाले पंतप्रधानाच्या नावाने पीक विमा योजना असून या योजनेमध्ये या कंपन्यानी शेतकऱ्यांना फसवले आहे. हजारो कोटी जमा करायचे आणि वाटताना शेकडो कोटी वाटायचे, क्लेम रिजेक्ट करायचे हाच उद्योग विमा कंपनीचा सुरु असल्याचा आराेप तुपकरांनी केला.

Ravikant Tupkar
Satara : जवान सुनील सांवत यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्य सरकारने सोयाबीनचे पंचनामे करण्याने आदेश आता दिले आहे. येलो मोजॅकचे पंचनामे सोयाबीन बाजारात गेल्यावर करता काय.आता पंचनाम्याची वेळ नसून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता सरसकट दहा ते पंधरा हजार रुपये हेक्टरी मदत करावी. मदत देतांना त्यात जाचक अटी निकष, हेक्टरची मर्यादाही सरकारने लादु नये. सरसकट मदत करावी.सोबतच विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्यासही टाळाटाळ केली आहे.

सरकार जर खर आणि शेतकऱ्यांच्या बाजूच असेल तर सरकारन शेतकऱ्यांच्या बाजूनं विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या बाजूनं जमा केली पाहिजे अन्यथा मुंबईतील एकही विमा कंपनीच कार्यालय आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे.

Ravikant Tupkar
Raju Shetti : अजित पवारांच्या इशा-यावर चालणार असाल तर शेतक-यांना विचार करावा लागेल; राजू शेट्टींचा सरकारला इशारा (पाहा व्हिडिओ)

तुपकर म्हणाले केंद्र व राज्य सरकार फक्त मिडीयात आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याच सांगत पण सरकार हे व्यापारी आणि भांडवलदारांच बाजूनं आहे. शेतकऱ्यांना लुटायचं आणि शेतकऱ्यांच्या लुटीतून जे काही तयार होईल त्याच्यातून राज्य करायचं असं सगळं सरकारच धोरण आहे.

माणसं पहिले गुलाम करायचे आणो त्याच्यावर राज्य करायचं असं धोरण असून सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापूसच्या उत्पादन खर्चपेक्षाही कमी बाजारात भाव असून शेतकऱ्याची होत असलेली तूट भरून काढायची कशी सरकार शेतकऱ्यांकडे बघणार आहे की नाही.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने एक रुपयात पीक विम्याच नाटक केल आहे. यात कीती शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हे येणार काळ सांगेल पण या विमा कंपन्या एवढ्या सोप्या नाहीय. आमची पूर्वीपासून मागणी आहे या विम्या कंपनीच्या भानगडीत अडकन्यापेक्षा जेवढे पैशे केंद्र व राज्यसरकार या विमा कपंनीना देतो ती रक्कम एकत्रित करून सरसकट तेलंगनाच्या धर्तीवर एकरी दहा ते पंधरा हजार प्रमाणे मदत करा अशी मागणी यावेळी तुपकर यांनी केली आहे.

Ravikant Tupkar
PM Modi To Visit Maharashtra : मोदींचा दाैरा अन् भाजपात तू तू मैं मैं

तुपकर म्हणाले विदर्भात येलो मोजॅक मुळे सोयाबीनचा उतारा कमी झाला आहे, बोड अळीमुळे कापसाचा उतारा कमी आहे,सांत्र्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धानाची परिस्थिती सध्या वाईट आहे. एवढंच नव्हे तर पावसाचं खंड पडल्याने रब्बीच हंगाम सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून जाणार आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दहा ते पंधरा हजार रुपये हेक्टरी मदत करावी, संपूर्ण कर्जमुक्ती करावी, सोयाबीनला नऊ हजार रुपये क्विंटल आणि कापसाला साडे बारा हजार रुपये क्विंटल भाव द्यावा यासंह इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी दौरा सूरु केल्याचे तुपकरांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले एक नोव्हेंबरला राज्याचा पहिल्या टप्याचा दौरा संपणार आहे. शेगाव येथे गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन एक नोव्हेंबरला एल्गार रथ यात्रा काढणार आहे. 20 नोव्हेंबरला विदर्भ आणि मराठवाड्याचा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा बुलढाणा येथे महामोर्चा असणार आहे.

बुलढाणा येथे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारसोबत रणसंग्राम होणार आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ताकद काय असते हे या मोर्चातून सरकारला दाखवणार आहे. या मोर्चातून एकतर सरकार जागेवर राहील अन्यथा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळेल यापैकी एक गोष्ट होईल.असं तुपकर यांनी सांगितलंय.

Edited By : Siddharth Latkar

Ravikant Tupkar
Lasalgaon Bazar Samiti : आता बस्स करा !कांद्याच्या भावात केंद्र शासनाने हस्तक्षेप करू नये; शेतक-यांची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com