ravikant tupkar
ravikant tupkarSaam tv

Ravikant Tupkar News: राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? रविकांत तुपकर यांनी स्पष्टच सांगितलं

Ravikant Tupkar News: रविकांत तुपकर यांनी राष्टवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत बंद दाराआड जवळपास एक तास चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.

संजय जाधव

Ravikant Tupkar News: बुलढाण्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राष्टवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत बंद दाराआड जवळपास एक तास चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. दोन्ही नेत्यांच्या भेटीने तुपकर हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चेवरून रविकांत तुपकर यांनी भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

एकनाथ खडसे यांच्या भेटीवर स्पष्टीकरण देताना तुपकर म्हणाले, 'एकनाथ खडसे आणि माझे कौटुंबिक संबंध आहे. पीक विमा संदर्भात मी ज्यावेळेस तुरुंगात गेलो होतो, त्यावेळेस नाथाभाऊ हे माझ्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते'.

'काल नाथाभाऊ हे बुलढाण्यात एका बैठकीसाठी आले होते. त्यामुळे मी त्यांना फक्त चहापानासाठी बोलावलं होतं. याचा राजकीय अर्थ काढू नये. माझे विरोधक माझी प्रतिमा शेतकऱ्यांच्या मनात संशयास्पद निर्माण होईल अशी निर्माण करण्याच्या प्रयत्नासाठी अशा भंपक गोष्टी बाहेर काढत आहे', असे तुपकर पुढे म्हणाले.

ravikant tupkar
Congress leader on mangal prabhat lodha: मंगल प्रभात लोढा मंत्री म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक; काँग्रेस नेत्याची सडकून टीका

पीक विम्याबाबत रविकांत तुपकर म्हणाले, 'बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पैसे जे पीक विम्याचे आहे. ते एआयसी कंपनीने दिले नाहीत. त्यामुळे आज आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव आंदोलन केलं. त्याची दखल घेत कृषी अधीक्षकांनी एका आठवड्याच्या आत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक लावून हा प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन आम्हाला दिलेला आहे. जर एक आठवड्याच्या आत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, तर एआयसी कंपनीच्या कार्यालयात घुसून मोठा आंदोलन आम्ही करू'.

ravikant tupkar
Cm Eknath Shinde on Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

'अजूनही बुलढाणा जिल्ह्यातील बहात्तर हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. कंपनीने 80 टक्के रक्कम अजूनही शेतकऱ्यांना दिली नाही. शेतकऱ्यांना एक एक रुपया मिळेपर्यंत आम्ही लढत राहू भले. आम्हाला तुरुंगात टाका जीव गेला तरी बेहतर पण आम्ही मागे हटणार नाही, असेही तुपकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com