Budget 2023 : अर्थसंकल्प नव्हे हे तर हेडलाईन मॅनेजमेंट, शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पानं : रवीकांत तुपकर

अर्थसंकल्पात केवळ माेठ माेठ्या घाेषणा आहेत यातून काही हाेणार नाही असेही तुपकर यांनी नमूद केले.
Ravikant Tupkar , Swabhimani Shetkari Sanghatana, Union Budget 2023
Ravikant Tupkar , Swabhimani Shetkari Sanghatana, Union Budget 2023saam tv

Union Budget 2023 Marathi News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman Latest News) यांनी नुकताच अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला. हा अर्थसंकल्पावर शेतक-यांसाठी (Farmers) फायदेशिर नाही. हा शहरी मतदारांना डाेळ्यासमाेर ठेऊन मांडलेला अर्थसंकल्प असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केली आहे.

Ravikant Tupkar , Swabhimani Shetkari Sanghatana, Union Budget 2023
Kokan News : काेकणात 'Pushpa' स्टाईल चाेरी, लाकडांसह दाेन ट्रक जप्त; राजकीय वर्तुळात खळबळ

स्वाभिमानीचे (swabhimani shetkari sanghatana) नेते रवीकांत तुपकर म्हणाले शेतकऱ्याच्या हिताचा हा अर्थसंकल्प नसून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखा हा अर्थ संकल्प आहे. मागील पाच वर्षाचा अर्थसंकल्पचे ऑडिट करायला पाहिजे अशी मागणी देखील तुपकर यांनी केली.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ज्या घोषणा जाहीर केल्या होत्या त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती झाली याची मांडणी करायला हवी. कापूस उत्पादकांसाठी खासगी आणि सरकारी माॅडेल करण्याची घाेषणा केली आहे. परंतु कापूस (cotton) उत्पादक यंदा मरत आहे. मरणाच्या दारात उभा आहे. उत्पादन खर्चाच्या पेक्षा देखील कमी दर कापूस आणि साेयाबीनला मिळत आहे. (Maharashtra News)

Ravikant Tupkar , Swabhimani Shetkari Sanghatana, Union Budget 2023
Turmeric Price : मुहूर्ताच्या हळद सौद्यात उत्पादक शेतकऱ्याची चांदी; प्रति क्विंटलला मिळाला दणदणीत भाव

खासगी बाजारात उत्पादन खर्चापेक्षा जादा दर मिळाला पाहिजे यासाठी काेणतीही संरक्षित रक्कम शेतक-यांसाठी ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. केवळ शेतक-यांच्या ताेंडाला पाने पुसली गेली आहेत. हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग आहे. केवळ माेठ माेठ्या घाेषणा आहेत यातून काही हाेणार नाही असेही तुपकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com